Hair Care- केस घनदाट, मऊ मुलायम होण्यासाठी खोबरेल तेलात आठवडाभर ही वस्तू केसांना लावा! केस होतील सिल्की शायनी.. वाचा, सविस्तर
तुरटीचा उपयोग हा प्रामुख्याने पाणी स्वच्छ करण्यासाठी पूर्वीपासून केला जायचा. परंतु तुरटीचा केवळ इतकाच उपयोग नसून, तुरटी ही सौंदर्यासाठी सुद्धा तितकीच महत्त्वाची मानली जाते. तुरटीचा वापर हा सौंदर्यासाठी सुद्धा खूप प्रकारे आपण करु शकतो. केवळ इतकेच नाही तर केसांसाठी सुद्धा तुरटी ही वरदान मानली जाते. आपल्या केसांसाठी खोबरेल तेल हे खूपच फायद्याचे आहे. पण या खोबरेल तेलामध्ये आपण तुरटी मिसळून लावल्यास केसांसाठी अधिक फायदा होऊ शकतो.
खोबरेल तेल आणि तुरटीचा वापर केसांसाठी कसा करावा?
केसांसाठी खोबरेल तेलासह तुरटीचा वापर करण्यासाठी, एका छोट्या भांड्यात नारळाचे तेल कोमट करुन घ्यावे. या तेलामध्ये थोडी तुरटीची पूड मिसळावी. हे मिश्रण ब्रशने केसांना न लावता आपल्या हाताच्या बोटांनी केसांच्या मुळाशी लावावे. किमान अर्धा तास ही तेलमिश्रित तुरटी तशीच ठेवून द्यावी. त्यानंतर शॅम्पूने केस धुवावे. न विसरता कंडीशनर लावावे.
खोबरेल तेलात तुरटी मिसळून लावण्याचे फायदे
तुरटी ही केसांच्या मजबूतीसाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे केस गळण्याची समस्या मोठ्या प्रमाणात कमी होते.
खोबरेल तेल आणि तुरटी एकत्र लावल्याने, केसातील कोंडा कमी होण्यास मदत होते.
तुरटी आणि खोबरेल तेल हे केसांना पोषण देण्यासोबत केसात आर्द्रता टिकवून ठेवते. त्यामुळे केस निरोगी राहण्यासाठी मदत होते.
केवळ केसच नाहीतर, केसांसोबत त्वचेलाही खोबरेल तेल मिश्रित तुरटी लावू शकतो. यामुळे मुरुमांची संख्या हमखास कमी व्हायला मदत होते.
तुरटी खोबरेल तेल लावल्यामुळे केस मुळापासून मजबूत होण्यासही मदत होते.
सध्याच्या घडीला रासायनिक प्रक्रिया केल्यामुळे, अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. खोबरेल तेल आणि तुरटीचा वापर केल्यामुळे, अकाली केस पांढरे होण्याचे प्रमाण कमी होते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला न विसरता घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List