कोलकात्याची मानसी घोष ‘इंडियन आयडॉल’, ट्रॉफीसह मिळाले 25 लाखांचे रोख बक्षीस
‘इंडियन आयडॉल 15’ ची ट्रॉफी कोण जिंकणार? याची उत्सुकता अनेक महिन्यांपासून लागली होती. अखेर रविवारी रात्री उशिरा कोलकात्याच्या 24 वर्षीय मानसी घोष हिने ही ट्रॉफी जिंकली. मानसीने आपल्या मधुर आवाजाच्या जोरावर स्पर्धक सुभाजीत चक्रवर्ती आणि स्नेहा शंकर यांना मागे टाकून ही ट्रॉफी आपल्या नावावर केली. आपल्या सुरेल आवाजाने उपस्थित प्रेक्षकांसह सर्वांची मने जिंकण्यात मानसी यशस्वी ठरली.
विजेती ठरल्यानंतर मानसीला ट्रॉफीसह 25 लाख रुपयांचे रोख बक्षीस देण्यात आले. मानसी ही मूळची पश्चिम बंगालच्या कोलकातामधील आहे. तिला लहानपणापासूनच गायनाची आवड होती. आठवीपासून तिने गायक होण्याचे स्वप्न पाहिले होते. 25 लाख रुपये मिळाल्याने आनंदीत झालेल्या मानसीने सांगितले की, मला स्वतंत्र संगीत बनवायचे आहे. त्यामुळे या पैशांचा वापर ती स्वतंत्र म्युझिक प्रोजेक्टस्साठी करणार आहे. तसेच या पैशांतून ती एक कारसुद्धा खरेदी करणार आहे.
चाहत्यांचे मानले आभार
इंडियन आयडॉल 15 ची विजेती ठरल्यानंतर मानसी घोषने पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे आभार मानले. मी विजेती ठरल्यानंतर माझ्या आई-वडिलांच्या डोळ्यांत अश्रू होते. ते आनंदाने रडत होते. मीही काही वेळ गोंधळले होते. कारण विजयाची भावना खूप मोठी होती. आम्ही सगळे खूप आनंदी आहोत. आयुष्य अचानक खूप बदलले आहे. मला देशभरातून प्रेम आणि आशीर्वाद मिळल्याने मी प्रचंड आनंदी आहे, अशा शब्दांत मानसी घोषने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List