उद्धव ठाकरेंनी कोकणच्या भूमीवर पाय ठेवताच गद्दारांची दाणादाण उडणार – संजय राऊत
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत रत्नागिरीतील काँग्रेसचे सहदेव बेटकर यांनी आज मातोश्री येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश केला. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी शिवसेना नेते खासदार संजय राऊत, शिवसेना नेते सचिव विनायक राऊत, शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
आपण सगळे शिवसैनिक आहात. सहदेव बेटकर यांच्या येण्याने हे जे नवीन कुरुक्षेत्रावरती महायुद्ध सुरू झालेलं आहे हे कोकणातलं युद्ध आपण जिंकणार आहोत. संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात आपला भगवा फडकवून, हे ठेकेदारांचं राज्य संपवून टाका. उद्धवसाहेब कोकण असेल किंवा संपूर्ण महाराष्ट्र असेल, एका कार्यकर्त्याच्या प्रवेशासाठी कोकणातून एवढ्या मोठ्यासंख्येने शिवसैनिक आणि कार्यकर्ते आलेत. सगळं जागेवर आहे, बाहेर फक्त हवा आहे. त्या हवेची दिशा बदलताना दिसते आहे. आपण फक्त कोकणामध्ये एक दौरा करा, कोकणच्या भूमीवर फक्त पाय ठेवा पाहा कशी दाणादाण उडतेय ती, एक गद्दार राहणार नाही औषधाला शिल्लक, असे संजय राऊत यावेळी म्हणाले.
जिथे भगवा फडकेल असा कोकणातला एकही कोपरा सोडायचा नाही, उद्धव ठाकरेंनी भरला हुंकार
ही सत्ता बित्ता आम्हाला नका तुम्ही दाखवू. कोकणामध्ये आम्ही खूप लढाया केलेल्या आहेत. ही काय पहिली वेळ आहे का? लढणाऱ्या शिवसैनिकांना आपल्याला ताकद द्यायची आहे. उद्धवजींच्या उपस्थितीत सहदेवजी आपला शिवसेना परिवारात प्रवेश झालेला आहे. नक्कीच आपल्याला पुढल्या भविष्यामध्ये राजकीयदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या याचा खूप फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. आपली जी ताकद आहे, ती यांच्यामागे उभी करा, असे संजय राऊत म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List