Immunity Power Boosting Fruits- आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ही फळे खायलाच हवीत!

Immunity Power Boosting Fruits- आपल्या शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी ही फळे खायलाच हवीत!

सध्याच्या घडीला जंक फूड आणि बाहेरचे अन्न आपण खात असल्यामुळे, दिवसागणिक आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होत आहे. शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्यावर, आपल्याला अनेक आजारांना सामोरे जावे लागते. म्हणूनच निरोगी राहण्यासाठी आपली प्रतिकारशक्ती ही उत्तम असणे हे खूप गरजेचे आहे. आपला आहार योग्यरित्या ठेवल्यास आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी काही फळे ही खूप महत्त्वाची मानली जातात.

प्रतिकारशक्ती वाढविणारी फळे

पेरू- पेरुमध्ये व्हिटॅमिन सी हे मोठ्या प्रमाणात असते. व्हिटॅमिन सी हे प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी खूप गरजेचे असते. म्हणूनच पेरूचा समावेश आहारात करणे गरजेचे आहे.

पपई- पचनासाठी उत्तम म्हणून पपईचा आपण रोज आहारात समावेश करतो. परंतु पपईमध्ये व्हिटॅमिन ई मुबलक प्रमाणात आढळते. हेच व्हिटॅमिन ई रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

लिची- लिचीचे फळ अधिक प्रमाणात खाल्ल्यामुळे, अन्न लवकर पचते. तसेच आपली रोग प्रतिकारशक्ती देखील वाढते. लिचीमध्ये अँटीवायरल गुणधर्म फार मोठ्या प्रमाणात आढळतात.

डाळिंब- डाळिंब कोणत्याही हंगामात उपलब्ध असते. डाळिंबामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. डाळिंबामध्ये दाहक गुणधर्म असतात, त्यामुळे चयापचय वाढते. डाळिंबामुळे शरीरामध्ये लाल रक्तपेशींचे प्रमाणही वाढते.

अननस- अननस हे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी उत्तम मानले जाते. मुख्य म्हणजे अननस आपण कोणत्याही ऋतुमध्ये खाऊ शकतो. अननसामध्ये व्हिटॅमिन सी, मॅंगनीज आणि अॅंटिआॅक्सिडंट्सचा उत्तम स्त्रोत असतो. यामुळे प्रतिकारशक्ती वाढीसाठी मदत मिळते.

 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार चिमुकल्यावर लैंगिक अत्याचार
एका रेल्वे स्थानकाजवळील पटरीजवळ नेऊन साडेसहा वर्षांच्या मुलावर 22 वर्षीय तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार मध्य मुंबईत घडला. याची...
आम्ही मराठी वाचणार… शालेय विद्यार्थ्यांसाठी अभिनव उपक्रम
एक्सप्लेनेड लिबरलला विजेतेपद
अभिनेत्याची फसवणूक; एकाला अटक
आजपासून कुमार गटाच्या 24 संघांमध्ये संघर्ष
पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी मध्य रेल्वे एक पाऊल पुढे, वर्षभरात 16 स्थानकांवर उभारले नवीन फूटओव्हर ब्रिज; मुंबईतील सात स्थानकांचा समावेश
महिला व्यावसायिकेची ऑनलाईन फसवणूक