बापरे ! इलेक्ट्रिशियनच्या पोटात पाच स्क्रू; पिंपरी-चिंचवडमधील हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

बापरे ! इलेक्ट्रिशियनच्या पोटात पाच स्क्रू; पिंपरी-चिंचवडमधील हॉस्पिटलमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया

डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी रुग्णाच्या फुफ्फुसात अडकलेले पाच आणि गिळलेले दोन असे एकूण सात मेटल स्क्रू काढून रुग्णाचा जीव वाचविला. एका 19 वर्षीय इलेक्ट्रिशियनला एका अपघातानंतर सातत्याने खोकला, छातीत दुखणे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याला डीपीयू सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले.

तो एका ठिकाणी फॉल्स सिलिंगसाठी अॅल्युमिनियमचे पत्रे बसवत असताना, उघड्या विद्युत तारेला पाय लागून त्याला जोरदार शॉक बसला. त्यामुळे तो खाली पडला आणि काहीकाळ बेशुद्ध झाला. याचदरम्यान त्याच्या तोंडात धरलेले पाच स्क्रू त्याच्या फुफ्फुसात गेले आणि दोन स्क्रू त्याने गिळले. शुद्धीवर आल्यानंतर त्याला 2-3 मिनिटे तीव्र खोकला, छातीत वेदना आणि श्वास घेण्यास अडथळा जाणवू लागला. डॉक्टरांनी तातडीने एक्स-रे काढल्यावर फुफ्फुसात पाच आणि पोटात दोन स्क्रू असल्याचे स्पष्ट झाले. सुदैवाने स्क्रूमुळे श्वसननलिकेला गंभीर दुखापत झाली नव्हती.

डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी येथील प्राध्यापक व श्वसन रोग विभागाचे प्रमुख, डॉ. एम. एस. बर्थवाल आणि त्यांच्या टीमच्या नेतृत्वाखाली हे स्क्रू काढण्यासाठी नियोजन केले. सामान्य भूल अंतर्गत महागड्या ब्रॉन्कोस्कोपीऐवजी टीमने कमी खर्चिक आणि कमी त्रासदायक असलेल्या फ्लेक्सिबल एअरवे तंत्राचा वापर करून हे ऑपरेशन यशस्वीपणे पार पाडले.

तीन तास चाललेली प्रक्रिया अत्यंत आव्हानात्मक ठरली. सर्व पाच स्क्रू डाव्या फुफ्फुसाच्या वरच्या भागातील श्वासनलिकेत अडकले होते आणि स्थानिक भूल देऊनही रुग्णाच्या सातत्याने होणाऱ्या खोकल्यामुळे त्याच्या स्थितीत बदल होत होता. विशेष रॅट-टूथ आणि डॉर्मिया बास्केट फोर्सेप्ससारख्या प्रगत उपकरणांच्या मदतीने सर्व पाच स्क्रू यशस्वीपणे काढण्यात आले. प्रक्रियेदरम्यान, एक स्क्रू ओरोफॅरिंक्समध्ये सरकून रुग्णाने गिळला. मात्र, पुढील 48 तासांत पोटातील दोन स्क्रू नैसर्गिकरीत्या बाहेर पडले.

या आव्हानात्मक उपचाराला डॉक्टरांनी यशस्वीपणे पार पाडल्याचा आम्हाला अभिमान आहे. या उपचारामुळे केवळ रुग्णाचा जीव वाचवण्यात यश मिळाले नाही, तर फुफ्फुस उपचारांच्या क्षेत्रातही एक नवे मानक प्रस्थापित झाले आहे.
– डॉ. भाग्यश्री पाटील, प्र-कुलपती, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप, पुणेकरांची उग्र निदर्शने; चिल्लर फेकली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात संताप, पुणेकरांची उग्र निदर्शने; चिल्लर फेकली
तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाविरोधात आज संतापाची लाट उसळली. नामफलकाला काळे फासत प्रशासकांवर चिल्लर फेकून...
‘दीनानाथ’ला आमचे पैसे घ्या, पण उपचार अडवू नका! शिवसेनेचा धर्मादाय सहआयुक्तांना घेराव
साताऱ्यात उद्योगमंत्र्यांवर खोट्या नोटांचा पाऊस
वक्फवरून गुजरात, बिहारसह आठ राज्यांत भडका, जुम्म्याच्या नमाजानंतर ठिणगी पडली; रस्त्यावर उद्रेक, उग्र निदर्शने
तुमच्या वादाशी प्रकल्पग्रस्तांना काहीही देणे घेणे नाही, मिठी नदी प्रकल्पबाधित भरपाईच्या प्रतीक्षेत; हायकोर्टाने सरकारला सुनावले
डोंगरी बालगृहातील मुलांची ‘हाऊसफुल्ल’कलाकारी, मुलांच्या काल्पनिक व्यावसायिक नाटकाला प्रेक्षकांची पसंती
अमेरिकेची जगभरात ‘कर’कचून नाकाबंदी, फ्रान्सने गुंतवणूक थांबवली चीनने 34 तर कॅनडाने 25 टक्के कर लादला