अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठी रिव्हॉल्व्हरचा धाक, KDMC च्या पथकावर मिंधेंच्या माजी नगरसेवकाचा गुंडांसह हल्ला

अनधिकृत बांधकामांवरील कारवाई रोखण्यासाठी रिव्हॉल्व्हरचा धाक, KDMC च्या पथकावर मिंधेंच्या माजी नगरसेवकाचा गुंडांसह हल्ला

बेकायदा बांधकामांवरून न्यायालयाने कल्याण-डोंबिवली महापालिकेला फटकारल्यानंतर प्रशासनाने प्रभागनिहाय अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम हाती घेतली आहे. याचाच भाग म्हणून कल्याणजवळील वडवली येथे अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या केडीएमसीच्या पथकावर मिंधे गटाच्या माजी नगरसेवकाने गुंडांसह जीवघेणा हल्ला केला. अनधिकृत बांधकामावरील कारवाई रोखण्यासाठी दुर्योधन पाटील आणि त्याचा मुलगा वैभव याने रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत थयथयाट केला. बेकायदा कामांना खतपाणी घालण्यासाठी मिंधे कायदा सुव्यवस्थेसह धिंडवडे काढत असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

वडवली येथे अनधिकृत बांधकाम सुरू असल्याची माहिती ‘अ’ प्रभाग कार्यालयातील पथकाला मिळाली होती. या माहितीनुसार ‘अ’ प्रभागक्षेत्र पथकप्रमुख राजेंद्र साळुंखे, अधीक्षक शिरीष गर्गे यांच्यासह आशिष टाक, विलास साळवी, रमेश भाकरे यांच्यासह कर्मचारी कारवाई करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. अनधिकृत बांधकामाची पाहणी करत असताना माजी नगरसेवक दुर्योधन पाटील व त्याचा मुलगा वैभव आपल्या गुंड साथीदारांसह पोहोचला. त्याने अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्यास कडाडून विरोध केला. अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी केडीएमसी गाडीच्या काचादेखील त्यांनी फोडल्या.

सहा वर्षांनंतर भूमाफियांविरोधात एमआरटीपी

डोंबिवली – जुनी डोंबिवली भागात वैभव मंगल कार्यालयासमोरील जागेत दोन भूमाफियांनी 2019 मध्ये बेकायदा सहा मजली इमारत उभारली होती. अखेर सहा वर्षांनंतर पालिकेच्या ‘ह’ प्रभाग अधिकाऱ्यांनी याप्रकरणी एमआरटीपी गुन्हा दाखल केला आहे. शंकर ठाकूर आणि बिली गोढे अशी या भूमाफियांची नावे आहेत. सदनिका विकून भूमाफिया गब्बर झाले. आता सदनिका विकत घेणाऱ्यांच्या डोक्यावर मात्र इमारत तुटण्याची टांगती तलवार आहे. फसवणूक करणारे शंकर ठाकूर आणि बिली गोढे यांना अटक करण्याची मागणी होत आहे.

बंदूक परवाना रद्द करा!

अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जीव कल दुर्योधन पाटील याने अधिकाऱ्यांना दमदाटी करत गाडीची तोडफोड केली. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे भेदरलेल्या वाचवण्यासाठी घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी केडीएमसी अधिकाऱ्यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात माजी नगरसेवक दुर्योधन पाटील, त्याचा मुलगा वैभव व त्यांच्या गुंड साथीदाराविरोधात तक्रार दाखल केली. दुर्योधन पाटील आणि त्याचे गुंड राजरोस फिरत असतानाही पोलीस त्यांना अटक करत नसल्याने पालिका अधिकारी गृह मंत्रालयाकडे तक्रार करणार आहेत. दुर्योधन पाटील याचा बंदूक परवाना रद्द करण्याची मागणी डीसीपी यांच्याकडे केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन, वयाच्या 61व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे निधन, वयाच्या 61व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
मराठी मालिकाविश्वात आणि चित्रपटात आपल्या दमदार अभिनयाचा ठसा उमटविणारे जेष्ठ अभिनेते डॉ. विलास उजवणे यांचे आज निधन झाले. वयाच्या 61व्या...
मुंबई इंडियन्सचा पुन्हा फ्लॉप शो, लखनौ सुपर जायंट्सने 12 धावांनी केला पराभव
ग्राहकांसाठी खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचा भाव
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे महिलेचा मृत्यू, चौकशीसाठी समिती स्थापन
बेकायदा बांधकामांवर कारवाई करणे पालिकांचे कायदेशीर कर्तव्यच; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा
लग्नाचा 25वा वाढदिवस, पत्नीसोबत डान्स, नाचता नाचता कोसळला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं
IPL 2025 – थला CSK च्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार! दिल्लीविरुद्ध उतरणार मैदानात?