Waqf Amendment Bill – राज्यसभेत वादळी चर्चा… गदारोळ; लोकसभेत बुलडोझरद्वारे विधेयक मंजूर करून घेतले, सोनिया गाधी गांधी यांनी तोफ डागली

Waqf Amendment Bill – राज्यसभेत वादळी चर्चा… गदारोळ; लोकसभेत बुलडोझरद्वारे विधेयक मंजूर करून घेतले, सोनिया गाधी गांधी यांनी तोफ डागली

वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर झाल्यानंतर आज राज्यसभेत या विधेयकाला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागले. दुपारी एक वाजता हे विधेयक मांडले गेले. त्यानंतर वादळी चर्चा आणि गदारोळ पाहायला मिळाला. मध्यरात्रीनंतरही चर्चा सुरू होती. दरम्यान, वक्फ विधेयकाविरोधात देशभरात आंदोलन सुरू झाले असून आजही संतप्त निदर्शने झाली तर लोकसभेत विधेयकाला पाठिंबा देणाऱ्या नितीश कुमारांच्या जदयूचे नेते कासीम अन्सारी यांनी निषेध नोंदवत पक्षाला रामराम ठोकला.

चर्चा सुरू असताना आम आदमी पक्षाचे खासदार संजय सिंह यांनी भाजपच्या नेत्यांनी राम मंदिराच्या नावावर वर्गणी मागितली आणि त्यात घोटाळा केला, असा आरोप केला. भाजपच्या खासदार चंचा चोर असे ते म्हणाले. यावरून सभागृहात एकच गदारोळ उडाला. यानंतर राज्यसभा सभापतींनी संजय सिंह यांचे आक्षेपार्ह विधान कामकाजातून काढून टाकले. दुपारी एक वाजल्यापासून चर्चा सुरू झाली. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांनी विरोधकांवर निशाणा साधला. आम्ही यूपीए सरकारच्या तुलनेत या विधेयकाला अधिक गांभीर्याने घेतले आहे. हा विषय राजकीय पक्षांचा नसून राष्ट्रीय आहे, त्यामुळे या विषयावर चर्चा झाली पाहिजे. विधेयकात कुंभमेळा, बिहारची निवडणूक, एअर इंडिया तर केरळमधील सिनेमा असे विषय येत आहेत. चर्चेला भरकटवू नये असे आवाहन नड्डा यांनी केले.

माझ्याकडे एक इंचही जमीन नाही – खरगे

अनुराग ठाकूर यांचे आरोप फेटाळतानाच माझ्याकडे एक इंचही जमीन नाही. जमीन हडपल्याचे आरोप सिद्ध झाले तर मी राजीनामा देईन, असे उत्तर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी राज्यसभेत दिले.जर भाजपचे लोक मला घाबरवून झुकवू पाहत असतील तर मी कधीच झुकणार नाही. मी मोडेन, पण वाकणार नाही. लक्षात ठेवा घाबरवण्याने मी घाबरणारा नाही, असा इशारा खरगे यांनी ‘पुष्पा’ स्टाईलने सरकारला दिला.

लोकसभेत बुलडोझरद्वारे विधेयक मंजूर करून घेतले, सोनिया गांधी यांनी तोफ डागली

लोकसभेत बुलडोझरद्वारे म्हणजेच सर्व विरोध डावलून आपला अजेंडा रेटत वक्फ विधेयक मंजूर करण्यात आले, असा आरोप काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी केला. हे विधेयक म्हणजे संविधानाचा अंत असून समाजात फूट पाडण्यासाठीची भाजप सरकारची रणनीती आहे, असे त्या म्हणाल्या. काँग्रेस संसदीय समितीच्या बैठकीत त्या बोलत होत्या. मोदी सरकार देशाला रसातळाला नेत आहे. असेच सुरू राहिले तर संविधान केवळ कागदावरच राहील. संविधान उद्ध्वस्त करण्याचा सरकारचा डाव आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ग्राहकांसाठी खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचा भाव ग्राहकांसाठी खूशखबर! सोन्याच्या दरात मोठी घसरण, जाणून घ्या आजचा भाव
सोने खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी आहे. दिल्लीतील सराफा बाजारात शुक्रवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली. सोन्याचे दर 1350 रुपयांनी घसरून 93000...
दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या मुजोरपणामुळे महिलेचा मृत्यू, चौकशीसाठी समिती स्थापन
बेकायदा बांधकामांवर कारवाई करणे पालिकांचे कायदेशीर कर्तव्यच; हायकोर्टाचा महत्वपूर्ण निर्वाळा
लग्नाचा 25वा वाढदिवस, पत्नीसोबत डान्स, नाचता नाचता कोसळला आणि क्षणात होत्याचं नव्हतं झालं
IPL 2025 – थला CSK च्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणार! दिल्लीविरुद्ध उतरणार मैदानात?
अमेरिकेच्या टॅरिफवर PM मोदींचे ‘मौन व्रत’, काँग्रेसने केली टीका
PHOTO – मुंबईत धुळीचे वादळ!