सायबर पोलिसांची तत्परता, 11 कोटींना फसवणुकीचा प्रयत्न फसला
सायबर पोलिसांच्या तत्परतेमुळे पवईतील एका कंपनीची 11 कोटी 19 लाखांची फसवणूक वेळीच थांबवता आली. पवई येथील कंपनीचा ईमेल आयडी हॅक करून कोटक महिंद्रा बँकेला ई-मेल केला. त्यात बँकेला व्यवसाय ऑपरेशनसाठी 11 कोटी 34 लाख 85 हजार रुपयांची गरज असल्याची बतावणी करण्यात आली होती. पैसे दोन वेगवेगळय़ा खात्यांत ट्रान्स्फर करण्यास सांगण्यात आले होते.
या कंपनीचे ई-मेल आयडी स्फुफिंग (हॅकिंग) करून एका सायबर ठगाने कंपनीच्या खात्यातून पैसे काढले. हा प्रकार लक्षात येताच कंपनीच्या पदाधिकाऱ्याने मुंबई पोलिसांच्या 1930 सायबर हेल्पलाईनला संपर्क साधत तक्रार केली. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे याच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक निवृत्ती बावस्कर, उपनिरीक्षक राऊळ, काकड आदींच्या पथकाने तपास सुरू केला. पोलिसांनी बँक अधिकाऱ्यांना संपर्क साधला. वेळीच संपर्क साधून खात्यातील 11 कोटी 19 लाख रुपये गोठवले. त्यामुळे पुढील फसवणूक टळली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List