काय डोंगर, काय झाडी फेम शहाजी बापूंनी गायलं नवं गाणं, कुणाल कामराच्या वादात उडी

काय डोंगर, काय झाडी फेम शहाजी बापूंनी गायलं नवं गाणं, कुणाल कामराच्या वादात उडी

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराच्या एका गाण्यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला होता. या गाण्याच्या माध्यमातून त्याने नाव न घेता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली होती, त्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झाले. कुणाल कामराच्या स्टुडिओची तोडफोड करण्यात आली. दरम्यान त्यानंतर आता शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी देखील एक गाणं म्हणत कुणाल कामराला प्रत्युत्तर दिलं आहे.

नेमकं काय म्हणाले शहाजी बापू?  

‘मातोश्री के अंगण मे कामरा आया सुपारी लेके गाना गाया, उद्धवजी को खुशी आया लेकीन ठाणे का टायगर आखो मे अंगार उबाठा को खत्म करणे महाराष्ट्र के मैदान में आया,’ असं गाणं यावेळी शहाजी बापू यांनी म्हटलं आहे. दरम्यान कुणाल कामराच्या या विडंबनात्मक गाण्यामुळे राज्यातील 14 कोटी जनतेचं मन दुखावले आहे, त्यामुळे आपन सांगोला येथे कुणाल कामराच्या विरोधात तक्रार दाखल करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं.

पुढे बोलताना ते म्हणाले की, महापुरुषांबद्दल अवमानकारक वक्तव्य करणाऱ्यांना कडक शिक्षा करण्यात यावी, असा कायदा पारित व्हावा यासाठी मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना पत्र देणार आहे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्ली दरबारी आपले वजन वापरून निधी मिळवून शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं, निवडणूक काळात शेतकऱ्यांना दिलेलं कर्जमाफीचं वचन पूर्ण करावं, आपली फसवणूक झाली अशी भावना शेतकऱ्यांची होऊ नये, अशी मागणीही यावेळी शहाजी बापू यांनी केली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवर देखील प्रतिक्रिया दिली आहे. अर्थमंत्री अजित पवार हे कधीही खोटं बोलत नाहीत, त्यामुळे त्यांनी तिजोरीची वास्तवता सांगितली आहे तरीही त्यांनी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवावी. त्याचबरोबर केंद्रातून निधी आणून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणाही लवकरात लवकर करावी अशी मागणी शहाजी बापू पाटील यांनी यावेळी केली आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुनील शेट्टीचा सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नाही पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुनील शेट्टीचा सिनेमा पाकिस्तानमध्ये प्रदर्शित होणार नाही
बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीचा आगामी चित्रपट ‘केसरी वीर: लीजेंड्स ऑफ सोमनाथ’ सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट संपूर्ण जगात प्रदर्शित होणार...
मोठी बातमी! अखेर कुणाल कामराची होणार चौकशी
Pahalgam Terror Attack: ‘उद्देश केवळ लोकांना मारणे नव्हता तर…’, सोनाक्षीची लक्षवेधी पोस्ट
वादळात हरवलेलं कासव घरी परतलं
कामाची बात! स्मार्टफोनची बॅटरी लाईफ वाढवणाऱ्या टिप्स
Breaking : गद्दार गीत प्रकरणी हायकोर्टाचा कुणाल कामराला मोठा दिलासा, अटकेपासून संरक्षण
Medha Patkar Arrest – सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना अटक, नेमकं प्रकरण काय?