दिशा सालियान मृत्यू प्रकरणात क्लोजर रिपोर्ट संशयास्पद, संजय निरुपम यांचा दावा काय?
Disha Salian Case: बॉलीवूड कलाकार सुशांत सिंह राजपूत याची मॅनेजर दिशा सालियान मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन वक्तव्य येत आहे. शिवसेना नेते संजय निरुपम यांनी या प्रकरणातील क्लोजर रिपोर्टवर संशय व्यक्त केला आहे. मालवणी पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट संशयास्पद आहे. कारण या प्रकरणाची चौकशी सुरु असताना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. त्यांच्या मुलगा आदित्य ठाकरे यांचे नाव याप्रकरणात आले होते, असे निरुपम यांनी म्हटले आहे. मालवणी पोलिसांनी बहुतेक सरकारच्या दबावाखाली काहीतरी चौकशी करून काही तरी एक निष्कर्ष काढलेल्या असेल, असा दावा त्यांनी केला.
संजय निरुपम यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, आम्ही कधीही क्लोजर रिपोर्ट वाचलेला नाही. पण ज्याप्रमाणे क्लोजर रिपोर्टच्या आधारावर संजय राऊत दावा करतात. दिशा सालियान हिच्या वडिलांवर आक्षेप घेत आहेत, त्याबद्दल मला एवढाच सांगायचे आहे, तुमच्या एका नेत्याने दिशा सालियानची लाज लुटली. आता तुम्ही त्यांच्या वडिलांचे चरित्रहरण करत आहात. एक मुलीवर अत्याचार झालेला आहे. ज्यांनी अत्याचार केलेला आहे त्यांच्या विरोधात कारवाई होऊ द्या, त्यांना शिक्षा मिळाली पाहिजे, ही भूमिका ठेवा. दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणांमध्ये सध्या जी चौकशी सुरु आहे, त्यात अडथळा आणू नका, असे निरुपम यांनी म्हटले.
…तर देशद्रोहाच्या गुन्हा दाखल होईल
कुणाल कामरा प्रकरणावर बोलताना संजय निरुपम म्हणाले, कुणाल कामरा म्हणजे एक लेप्टीस कम्युनिटीच्या माणूस आहे. भारत विरोधी मानसिकतेचे लोक खूप आहेत. भारतात राहणारे पण भारताला विरोध करणारे, सरकारला विरोध करणाऱ्यांना खूप फंडीग होत आहे. कुणाल कामरा यांना गीतासाठी कुठून, कुठून पैसे आले आहेत, हे चौकशीतून समोर येईल. भारत विरोधी आणि देशद्रोही घडामोडीत सहभागी असणाऱ्या लोकांकडून त्यांनी पैसे घेतले असतील तर त्यांच्यावर देशद्रोहाच्या गुन्हा दाखल होईल. ते या प्रकरणात वाचणार नाही. त्यांनी जे पाप केले आहे, त्याची त्यांना शिक्षा मिळेल, असे निरुपम यांनी म्हटले.
नवरात्रीमध्ये मासांहारी दुकान बंद करण्याची मागणी होत आहे, त्यावर बोलताना ते म्हणाले, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात देवीची पूजा अर्चना होते. 30 तारखेला गुढीपाडव्याच्या दिवशी नवरात्रीला सुरुवात होत आहे. या काळात मोठा प्रमाणात लोक देवीचे जागरण करतात. उपवास करतात. मंदिरात एक जल्लोषचे वातावरण असते. या परिस्थितीमध्ये मुंबईमध्ये जे काही मीट मटणची दुकाने सुरु आहे, ती बंद राहिली पाहिजे. नाक्या नाक्यावर चिकन शोरमा जे काउंटर सुरु आहेत ते बंद झाले पाहिजे. यामुळे मी मुंबई पोलिसांना विनंती करतो नवरात्रीमध्ये चिकन शोरमाची दुकान बंद केली पाहिजे, असे संजय निरुपम यांनी म्हटले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List