प्रभास अडकणार लग्नबेडीत, जोरदार तयारी सुरु; कोण आहे बाहुबलीची देवसेना?

प्रभास अडकणार लग्नबेडीत, जोरदार तयारी सुरु; कोण आहे बाहुबलीची देवसेना?

दक्षिण चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रभासने आपल्या उत्कृष्ट अभिनयाने सर्वांचे मन जिंकलं आहे. प्रभासने त्याच्या अभिनयाने लाखो मुलींची मने जिंकली आहेत. पण आम्ही तुमच्यासाठी आणलेली बातमी लाखो मुलींचे मन दुखवू शकते. प्रभास आता घोडीवर स्वार होण्यास सज्ज आहे. एका व्यावसायिकाच्या मुलीशी त्याचे नातेसंबंध असल्याचे वृत्त आहे.

प्रभास वयाच्या 45 व्या वर्षी करणार लग्न

प्रभास वयाच्या 45 व्या वर्षी लग्न करणार आहे. त्याचे चाहते बऱ्याच काळापासून अभिनेत्याच्या लग्नाची वाट पाहत होते. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. पण चाहत्यांचा असा समज होता की, प्रभार आणि बाहुबलीची ‘देवसेना’ अनुष्का शेट्टीसोबत लग्न करेल. पण तसं नाहीये. मग कोण आहे बाहुबलीची देवसेना माहितीये?

प्रभासच्या कुटुंबाने त्याच्यासाठी वधू शोधली

असं म्हटलं जातं की प्रभासच्या कुटुंबाने त्याच्यासाठी वधू शोधली आहे. तथापि, ती मुलगी कोण आहे आणि ती काय करते याबद्दलची माहिती उघड झालेली नाही. मुलीचे वडील हैदराबादचे एक मोठे व्यावसायिक आहेत. सध्या प्रभासच्या लग्नाबाबतची महत्त्वाची माहिती गुप्त ठेवण्यात आली आहे. प्रभास लवकरच त्या व्यावसायिकाच्या मुलीशी लग्न करणार आहे. कुटुंबाने लग्नाची तयारी सुरू केल्याचे वृत्त आहे. श्यामला देवी म्हणजे प्रभासची मावशी लग्नाची तयारी करत आहेत. तथापि, याशिवाय इतर कोणतीही मोठी माहिती समोर आलेली नाही.

प्रभासच्या कामाबद्दल 

2024 मध्ये ‘कलकी 2898 एडी’ या चित्रपटामुळे प्रभास चर्चेत आला होता. अमिताभ बच्चन, कमल हासन आणि दीपिका पदुकोण सारखे दिग्गज कलाकार देखील या चित्रपटाचा भाग होते. 1100 कोटींपेक्षा जास्त कमाई करून हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला. आता प्रभास ‘द राजा साब’ आणि ‘फौजी’ या चित्रपटांमध्ये व्यस्त आहे. लवकरच, प्रभास ‘अ‍ॅनिमल’ आणि ‘कबीर सिंग’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे संदीप रेड्डी दिग्दर्शित ‘स्पिरिट’ चित्रपटाचे शूटिंग सुरू करणार आहे. पण सध्या तरी प्रभास ‘कन्नप्पा’ द्वारे चाहत्यांना आश्चर्यचकित करणार आहे. 25 एप्रिल रोजी प्रदर्शित होणाऱ्या अभिनेता विष्णू मंचूच्या चित्रपटात प्रभास एक छोटीशी भूमिका साकारताना दिसणार आहे.

 

 

 

 

 

 

 

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले? ‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले?
आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा झाला, या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे  यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ईव्हीएमपासून ते मराठी...
बीडमध्ये राखेतून गुंड निर्माण होतात… संतोष देशमुख प्रकरणावरून राज ठाकरे यांचा घणाघात
मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? राज ठाकरे यांचा थेट सवाल
औरंगजेबाची कबर उखडून टाकावी का? राज ठाकरे यांची पहिलीच प्रतिक्रिया काय? काय केली सूचना?
शिवाजी महाराजांसमोरच संभाजी महाराजांनी औरंगजेबाची मनसबदारी स्वीकारली होती, राज ठाकरे यांचं मोठं विधान, शिवकालीन परिस्थिवर केलं भाष्य
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत… राज ठाकरे यांचा छावा चित्रपटानंतर झालेल्या वादावरुन जोरदार हल्लाबोल
औरंगजेबावरुन राज ठाकरे यांचे राजकारण्यांना फटकारे, काय म्हणाले पाहा ?