रक्तस्त्रावामुळे उलट्या,चेहरा पांढरा पडला, अंत्यसंस्कार वधूसारखे; स्मिता पाटीलचा शेवट इतका भयानक
बॉलिवूडमध्ये अशा अनेक अभिनेत्री आहेत ज्यांच्या अभिनयापासून ते त्यांच्या सौंदर्यापर्यंत सर्वांनाच भूरळ पडायची. पण त्यांच्या अचानक झालेल्या एक्सीटने सर्वांनाच धक्का बसला. अशीच एक अभिनेत्री होती जिने अभिनयाने आणि सौंदर्यांमुळे सर्वांच्याच मानवर राज्य केलं होतं. तिने घेतलेल्या अचानक एक्सीटने सर्वांच्या मनाला चटका लागला होता. ज्या अभिनेत्रीची आजही तेवढीच आठवण काढतात. ती हरहुन्नरी अभिनेत्री म्हणजे स्मिता पाटील. पण तिचा शेवट एवढा भयानक होईल अशी कल्पना कोणीच केली नव्हती.
मातृत्वाचा आनंद अन् अवघ्या 15 दिवसांतच मृत्यू
स्मिता पाटील बॉलीवूडमधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रींपैकी एक. स्मिता पाटीलने तिच्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मने जिंकली. मात्र, केवळ 31 व्या वर्षीच तिने जगाचा निरोप घेतला. मातृत्वाचा आनंद मिळाल्यानंतर अवघ्या 15 दिवसांतच तिचा मृत्यू झाला. पण तिच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी हादरली होती. 28 नोव्हेंबर 1986 रोजी स्मिता पाटीलने मुलाला, प्रतीक बब्बरला जन्म दिला. मात्र, डिलिव्हरीनंतर त्यांच्या प्रकृतीत अचानक बिघाड झाला.
रक्तस्त्रावामुळे त्यांचा चेहरा फिकट पडला, सतत उलट्या
रक्तस्त्रावामुळे त्यांचा चेहरा फिकट पडला, सतत उलट्या होत राहिल्या. परिस्थिती इतकी गंभीर झाली की त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 12 डिसेंबर रोजी त्यांची प्रकृती अधिकच खालावली आणि त्या कोमात गेल्या. दुर्दैवाने, 13 डिसेंबर 1986 रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मात्र स्मिताने तिच्या कुटुंबीयांना सांगितले होते की, तिच्या मृत्यूनंतर तिचे अंत्यसंस्कार वधूसारखे करावेत. अशीच तिची शेवटची इच्छा होती. आणि ती पूर्णही करण्यात आली. तिला वधूसारखे सुंदर कपडे घालून शेवटचा निरोप देण्यात आला.
स्मिताच्या मृत्यूनंतर राज बब्बर पुन्हा त्यांच्या पहिल्या पत्नी नादिराकडे परतले
स्मिता पाटील आणि राज बब्बर यांच्या प्रेमकहाणीची त्या काळी मोठी चर्चा होती. राज बब्बर आधीपासूनच विवाहित होते आणि दोन मुलांचे वडील होते. तरीही त्यांनी स्मिताशी लग्न केलं. मात्र, त्यांच्या नात्यावर अनेकदा वाद झाले. स्मिताच्या कुटुंबीयांनाही हे नातं मान्य नव्हतं. विशेष म्हणजे, स्मिताच्या मृत्यूनंतर राज बब्बर पुन्हा त्यांच्या पहिल्या पत्नी नादिराकडे परतले.
नात्यातील दुरावा चर्चेचा विषय ठरला
स्मिता पाटील यांचा मुलगा प्रतीक बब्बर देखील अभिनय क्षेत्रात आहे. काही महिन्यांपूर्वी त्याने प्रिया बॅनर्जीशी लग्न केले. मात्र, लग्नात त्याचे वडील राज बब्बर सहभागी झाले नाहीत. त्यांच्या नात्यातील दुरावा चर्चेचा विषय ठरला. काही दिवसांपूर्वीच प्रतीकने त्याचे आडनाव बदलत ‘प्रतीक स्मिता पाटील’असं ठेवले आणि त्याने आपल्या आईला अनोख्या पद्धतीने श्रद्धांजली अर्पण केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List