स्पॅम कॉलपासून लवकरच सुटका; जिओ, एअरटेल, व्हीची बिल्ट इन कॉलर आयडी सर्व्हिस येतेय

स्पॅम कॉलपासून लवकरच सुटका; जिओ, एअरटेल, व्हीची बिल्ट इन कॉलर आयडी सर्व्हिस येतेय

मोबाईल युजर्सला लवकरच स्पॅम कॉलपासून सुटका मिळण्याची शक्यता आहे. मोबाईलवर येणाऱ्या कॉलरचे नाव जाणून घेण्यासाठी टकॉलरसारख्या थर्ड पार्टी अॅप्सची मदत आता घ्यावी लागणार नाही. जिओ, एअरटेल, व्होडाफोन-आयडिया या तीन कंपन्या स्वतः कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव मोबाईल स्क्रीनवर दाखवणार आहेत. यासाठी या तीन कंपन्यांनी एचपी, डेल एरिक्शन आणि नोकियासोबत पार्टनरशिप केली आहे. या तीन कंपन्या एकत्रित येत सर्व्हर आणि सॉफ्टवेअर तयार करणार आहेत. त्यामुळे पुढील काळात युजर्सच्या मोबाईल स्क्रीनवर कॉल करणाऱ्या व्यक्तीचे नाव टकॉलरशिवाय आपोआप दिसेल.

टेलिकॉम कंपन्यांनी कॉलिंग नाव प्रेझेंटेशन (सीएनएपी) ला लागू करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे ऑर्डर केले आहेत. अनेक ठिकाणी यासाठी चाचणी घेतली जात आहे. एकदा टेक्नोलॉजी स्थिर झाल्यानंतर याला देशभरात रोलाऊट केले जाईल, परंतु ही टेक्नोलॉजी फीचर फोनवर काम करणार नाही. केवळ स्मार्टफोनवर काम करेल. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये टेलिकॉम रेग्युलेटरी अॅथोरिटी ऑफ इंडिया (ट्राय) ने सर्व स्मार्टफोन कंपन्यांना सीएनएपी लागू करण्याची शिफारस केली होती. याशिवाय ट्रायने सरकारला सर्व टेलिकॉम कंपन्यांना याला लागू करण्यासाठी बंधनकारक करावे, असेही म्हटले होते. सीएनएपी लागू झाल्यानंतर मोबाईल युजर्सची स्पॅम कॉलपासून सुटका होऊ शकते. मोबाईलवर कोण व्यक्ती कॉल करते, हे आधीच स्पष्ट होईल.

सीएनएपी कसे काम करेल

सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास ही सर्व्हिस टकॉलरसारखी काम करेल. जी व्यक्ती फोन करेल, त्या व्यक्तीचे नाव मोबाईलवर दिसेल. मोबाईलवर सीएनएपी लागू झाल्यानंतर स्क्रीनवर टेलिकॉम कंपनीतील नोंदणीकृत युजरचे नाव स्क्रीनवर स्पष्ट दिसेल. सुरुवातीला केवळ सारख्या कंपन्यांच्या युजर्सचे नाव दिसेल. म्हणजेच जिओ युजर दुसऱ्या जिओ युजरला कॉल करत असल्यास त्याचे नाव दिसेल. एअरटेल युजरने कॉल केल्यास ते स्क्रीनवर दिसणार नाही. आतापर्यंत सरकारने टेलिकॉम कंपन्यांदरम्यान ग्राहकांचा डेटा शेअर करण्याची परवानगी दिली नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले? ‘देवेंद्र फडणवीस… तर तुम्हाला माझा निश्चितच पाठिंबा’; राज ठाकरे असं का म्हणाले?
आज मनसेचा गुढीपाडवा मेळावा झाला, या मेळाव्यात बोलताना मनसे प्रमुख राज ठाकरे  यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ईव्हीएमपासून ते मराठी...
बीडमध्ये राखेतून गुंड निर्माण होतात… संतोष देशमुख प्रकरणावरून राज ठाकरे यांचा घणाघात
मग मराठा समाजाला आरक्षण का मागावं लागतं? राज ठाकरे यांचा थेट सवाल
औरंगजेबाची कबर उखडून टाकावी का? राज ठाकरे यांची पहिलीच प्रतिक्रिया काय? काय केली सूचना?
शिवाजी महाराजांसमोरच संभाजी महाराजांनी औरंगजेबाची मनसबदारी स्वीकारली होती, राज ठाकरे यांचं मोठं विधान, शिवकालीन परिस्थिवर केलं भाष्य
चित्रपटाने जागे होणारे हिंदू काही कामाचे नाहीत… राज ठाकरे यांचा छावा चित्रपटानंतर झालेल्या वादावरुन जोरदार हल्लाबोल
औरंगजेबावरुन राज ठाकरे यांचे राजकारण्यांना फटकारे, काय म्हणाले पाहा ?