कोकण रेल्वे एम्प्लॉईजच्या सदस्यांचा रेल कामगार सेनेमध्ये प्रवेश
कोकण रेल्वे रेल कामगार सेना युनिटची महत्त्वाची बैठक मंगळवारी मडगाव येथे संपन्न झाली. या बैठकीमध्ये कामगारांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली. यावेळी कायम मदतीला धावून येणाऱ्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कोकण रेल्वे एम्प्लॉइज युनियनच्या काही सदस्यांनी रेल कामगार सेनेमध्ये प्रवेश केला.
रेल कामगार सेनेचे अध्यक्ष शिवसेना नेते विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली कार्याध्यक्ष संजय जोशी, सरचिटणीस दिवाकर देव यांच्या नेतृत्वाखाली कोकण रेल्वे रेल कामगार सेना युनिटची बैठक मंगळवारी मडगाव येथे संपन्न झाली. या बैठकीत कामगारांच्या अनेक प्रश्नांवर चर्चा झाली तसेच संघटनेच्या पुढील वाटचाली संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कोकण रेल्वेचे भारतीय रेल्वेमधील विलीनीकरनासंदर्भात चालू असलेल्या चर्चा आणि त्यासंदर्भात शिवसेनाप्रणित रेल कामगार सेनेने केलेली कारवाई यासंदर्भात कामगारांना माहिती देण्यात आली.
या बैठकीला कोकण रेल्वे सरचिटणीस राजू सुरती, कार्याध्यक्ष विलास खेडेकर, संपर्कप्रमुख भारत शर्मा, अध्यक्ष शशी नायर, विश्वास राणे, दत्ता तेलंगे, संदेश, प्रेमकुमार प्रमोद, आरोलकर, बावधनकर, चंदन गुरव आणि अन्य कर्मचारी उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List