संपूर्ण दापोली विधानसभा मतदार संघच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचा आहे – अमोल किर्तीकर
दापोली विधानसभा मतदारसंघ हा फक्त आणि फक्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचाच आहे. तो यापुढे देखील राहील, असा ठाण विश्वास अमोल किर्तीकर यांनी वाकवली येथील शिवसैनिकांच्या सभेत बोलताना व्यक्त केला. शिवसेना उपनेते आणि युवासेना राष्ट्रीय सरचिटणीस अमोल किर्तीकर यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात शिवसेना पक्षाला उभारी देण्यासाठी दापोली, मंडणगड, खेड तालुक्यात दौरा सुरू केला आहे. या दौऱ्याच्या शुभारंभाची सुरुवात खेड शहरातून सुरू झाली.
दुसरी सभा दापोली तालुक्यातील वाकवली येथे टेटवली पंचायत समिती गणाचे उपविभाग प्रमुख संदिप जाधव यांच्या निवासस्थानाच्या अंगणात पार पडली. यावेळी दापोली विधानसभा संपर्क प्रमुख सचिन पाटील, शिवसेना उपजिल्हा प्रमुख विजय जाधव, जिल्हा सरचिटणीस अनिल जाधव, दापोली तालुका प्रमुख ऋषिकेश गुजर, खेड तालुका प्रमुख दत्ता भिलारे, दापोली तालुका सरचिटणीस नरेंद्र करमरकर, खेड नगरपरिषदचे तत्कालीन गटनेते बाळा खेडेकर, टेटवली विभाग प्रमुख रवींद्र घडवले, उपविभाग प्रमुख संदिप जाधव, वाकवली शिवसेना शाखाप्रमुख सुरेश जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List