इराणमध्ये महिलांवर ठेवली जातेय ड्रोन, अ‍ॅपद्वारे नजर; UN चा धक्कादायक अहवाल, कारण वाचून धक्का बसेल

इराणमध्ये महिलांवर ठेवली जातेय ड्रोन, अ‍ॅपद्वारे नजर; UN चा धक्कादायक अहवाल, कारण वाचून धक्का बसेल

इराणमध्ये महिलांना हिजाब घालणे बंधनकारक आहे. यासाठी कायदाही करण्यात आलेला आहे. कायदा मोडणाऱ्या महिलांवर कारवाईही केली जाते. अर्थात हिजाबविरोधात महिलांचा एक गट वेळोवेळी आंदोलनही करतो. मात्र आता याचबाबत एक धक्कादायक अहवाल समोर आला आहे. इराणमध्ये महिलांवर ड्रोन आणि अ‍ॅपद्वारे नजर ठेवली जात असल्याचा अहवाल यूएनने दिला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

हिजाबबाबतच्या कायद्याचे तंतोतंत पालन व्हावे म्हणून इराण अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. महिलांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोन, कॅमेरे आणि चेहरा ओळखणाऱ्या अ‍ॅपचा सरकारकडून वापर केला जात आहे. हिजाब न घालणाऱ्या महिलांची ओळख पटवून त्यांना कठोर शिक्षाही केली जात आहे.

इराण सरकारने आर्टिफिशिय इंटेलिजन्सचा वापरही सुरू केला आहे. याद्वारे महिला आणि तरुणींवर नजर ठेवली जात आहे. तसेच एका अ‍ॅपद्वारे हिजाब न वापरणाऱ्या महिलांचे चेहरा, त्यांच्या वाहनाचा नंबर, लोकेशनची माहितीही गोळी केली जात असून नंतर त्या महिलेला नोटीस पाठवली जात आहे, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे.

तक्रारीनंतर ऑटोमेटिक मेसेजिंग सर्व्हीसद्वारे नोटीस पाठवली जाते आणि सदर चूक पुन्हा करू नका, अन्यथा शिक्षा होईल असे ठणकावले जाते. तेहरान आणि आसपासच्या भागात हिजाबच्या सक्तीसाठी सरकारने ड्रोनही तैनात केले आहेत. तसेच एआय तंत्रज्ञानाने युक्त कॅमेरे विद्यापीठांमध्येही लावण्यात आले आहेत. हे मानवाधिकारांचे उल्लंघन असल्याचे यूएनने म्हटले आहे.

सोने स्वस्त असलेल्या देशांमध्ये दुबईचा नंबर सहावा… पहिले पाच देश कोणते जाणून घ्या..

इरामध्ये हिजाब सक्तीसाठी कायदा बनवण्यात आला होता. सुरुवातीला सार्वजनिक वाहने, टॅक्सी आणि अ‍ॅब्यूलन्समध्येही नाजर अ‍ॅप इन्स्टॉल करण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर खासगी वाहने आणि सार्वजनिक ठिकाणीही याचा वापर होऊ लागला. या अ‍ॅपद्वारे हिजाब न घालणाऱ्या महिलांवर नजर ठेवली जाते. अद्यापही येथे हिजाब सक्ती असून ज्या महिला हिजाब घालत नाही त्यांच्यावर अ‍ॅपद्वारे नजर ठेवली जाते, त्यानंतर ड्रोनद्वारे त्यांना ट्रेस केले जाते. आधी वार्निंग दिली जाते आणि कायद्याचे उल्लंघन पुन्हा केल्यास वाहन जप्त केले जाते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

या खात्याचे पैसे ‘लाडक्या बहिणी’कडे वळवले; मंत्र्यांचा संताप, दिला थेट इशारा या खात्याचे पैसे ‘लाडक्या बहिणी’कडे वळवले; मंत्र्यांचा संताप, दिला थेट इशारा
ज्या कुटुंबातील महिलांचं वार्षिक उत्पन्न हे अडीच लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू...
weight loss tips: फॅटला छुमंतर करण्यासाठी रोज रात्री प्या ‘हे’ हर्बल टी
उन्हाळ्यात आरोग्यासाठी दही की योगर्ट अधिक फायदेशीर? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला
नियमित दही खाणे उत्तमच, पण कोणत्या वेळेत खावे, फायदा जाणून घ्या…
अर्धापूर-नांदेड मार्गावर कार- ट्रकचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, सहा जखमी
परीक्षेत कमी गुण मिळाले, भविष्याच्या चिंतेतून पित्याने दोन मुलांना संपवून स्वतःची जीवनयात्रा संपवली!
लंडनमध्ये हायगेट स्मशानभूमीत 16 मार्चला डॉ. अशोक ढवळे यांचे कार्ल मार्क्स स्मृती व्याख्यान