अथिया शेट्टी आणि केएल राहुल झाले आई-बाबा, घरी लक्ष्मीचे आगमन
Athiya Shetty KL Rahul Baby Girl : अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल आई-बाबा बनले आहेत. अथिया शेट्टीने बाळाला जन्म दिला आहे. अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुलच्या घरी लक्ष्मीचे आगमन झाले आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुलला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत ही गोड बातमी दिली.
अथिया शेट्टी आणि केएल राहुलने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी मुलगी झाल्याची गोड घोषणा केली आहे. त्या दोघांनीही एक फोटो शेअर केला आहे. आम्हाला २४ मार्च २०२५ रोजी कन्यारत्नाचा लाभ झाला आहे, अथिया आणि राहुल, असे त्यांनी म्हटले आहे. अथिया शेट्टी आणि केएल राहुलने ही पोस्ट करताच अनेक कलाकारांनी कमेंट करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
अथिया शेट्टी आणि केएल राहुलच्या या पोस्टवर परिणीती चोप्रा, रिद्धिमा कपूर साहनी, मसाबा गुप्ता, शाहीन भट्ट, अर्जुन कपूर, कियारा अडवाणी, कृती सॅनन, कृष्णा श्रॉफ, शनाया कपूर यांनी लाईक केले आहेत.
८ नोव्हेंबरला दिलेली गुडन्यूज
अथिया शेट्टीने ८ नोव्हेंबरला इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करून ती आई होणार असल्याची माहिती दिली होती. ‘आमचा सर्वात सुंदर आशीर्वाद २०२५ मध्ये येणार आहे,’ असं कॅप्शन अथियाने दिले आहेत. आता त्या दोघांनी मुलीच्या जन्माची माहिती दिली.
दोन वर्षांपूर्वी केलेले लग्न
अथिया शेट्टी आणि केएल राहुल हे गेल्या काही वर्षांपासून डेट करत होते. त्यांनी दोन वर्षांपूर्वी २३ जानेवारी २०२३ रोजी लग्नगाठ बांधली. या दोघांचे लग्न सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर पार पडलं होतं. या लग्नाला फक्त दोघांचे कुटुंबीय आणि क्रिकेटविश्वातील व सिनेइंडस्ट्रीतील काही मोजकेच लोक उपस्थित राहिले होते. दरम्यान याआधी दीपिका पदुकोण, मसाबा गुप्ता आणि वरुण धवन या तिघांना कन्यारत्न प्राप्त झाले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List