Kunal Kamra : कुणाल कामराच्या मुसक्या आवळा, त्याचा बोलवता धनी कोण?; अर्जुन खोतकर आक्रमक
स्टॅँडअप कॉमेडियन कुणाल कामराने त्याच्या शोमध्ये एकनाथ शिंदेंवरील व्यंगात्मक गाणं सादर केलं आणि एकच गदारोळ माजला. या विडंबनात्मक गाण्यातील टिप्पणीमुळे शिवसैनिक तसेच सत्ताधारी नेतेही आक्रमक झाले असून काल शिवैसनिकांनी कामराच्या शोच्या सेटची तोडफोडही केली. त्याच्या या विधानाचे आज विधासभेतही पडसाद उमटलेले दिसले. सत्ताधारी आक्रमक झाले. मंत्री अर्जुन खोतकर यांनी या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतली.कामराच्या मुसक्यआ आवळत त्याला अटक केली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.
शरद पवार यांनीही एकनाथ शिंदे यांच्या कार्यक्षमतेचं कौतुक जाहीररित्या भाषणातून केलं आहे.पण कुणाल कामरा जो आहे तो हिंदू देव-देवतांचा अपमान करतो, त्याच्या मनात धार्मिक द्वेष आहे. त्याच्या विधानाने राज्यात दंगली घडू शकतात. कुणाल कामराच्या मुसक्या वेळीच आवळल्या नाहीत तर राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. अशी प्रवृत्ती वेळीच ठेचली पाहिजे, असे खोतकर म्हणाले.
या कामराचे कारनामे सर्वांसमोर ठेऊ शकतो. सुप्रीम कोर्टावरसुद्धा अत्यंत अभद्र टिप्पणी करण्याची मजल या कामराची आहे. त्याच्या वागण्यामुळे दोन विमान कंपन्यांनी सुकाद्धा प्रवास करण्यास त्याच्यावर बंदी घातली होती. पत्रकार अर्णव गोस्वामी किंवा इतर कोणी असेल, कॉमेडीच्या नावे सुपाऱ्या घेऊन इतर पक्षाच्या माध्यमातून सुपाऱ्या घेऊन राज्यातलं वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न कुणाल कामरा करतो, असा आरोप खोतकर यांनी केला.
कामराचा बोलवता धनी कोण ?
कामराचा बोलवता धनी कोण याचा शोध घेतला पाहिजे . तो फक्त भाड्याचा बाहुला आहे, पण खरा सूत्रधार कोणी और आहे, तो शोधला पाहिजे. या कामराला जेलची हवा खाऊ घातली पाहिजे , तोपर्यंत या मागचा मास्टरमाईंड कोण आहे हे निश्चितपणे समोर येणार नाही, असा दावा खोतकर यांनी केला. या राज्याची वेगळी प्रतिमा आहे. हे राज्य संतांचं म्हणतो.
या राज्यात आचार्य अत्रे असोत किंवा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे असोत, तेही टीका-टिप्पणी करायचे, पण त्यांनी कधीच पातळी सोडून टीका केली नाही. विरोधाच्या नावाखाली कामरासारखी विकृती पुन्हा डोकं वर काढू पाहता आहे. आर्टिकल 19/2चा उपयोग करण्याची गरज आहे. कोणाच्या कुचक्या डोक्यातून हा कचरा बाहेर पडाला याचा विचार केला पाहिजे, शोध घेतला पाहिजे. कामराचे फोन कॉल रेकॉर्ड तपासा, त्याला कोणाकडून फंडिंग मिळालं हे तपासलं पाहिजे अशी मागणी खोतकर यांनी केली.
कुणाल कामराला चोप दिला पाहिजे – संजय शिरसाट,
कुणाल कामराने ज्या पद्धतीने टीका केली आहे, त्याला शिवसैनिकांनी चोख प्रत्युत्तर दिलं आहे. लोकशाहीमध्ये तुम्हाला बोलायचा अधिकार दिला आहे म्हणून कोणाच्याही चारित्र्यावर, कोणाच्याही नेतृत्वावर टीका करणं योग्य नाही. कुणाल कामराने एकनाथ शिंदेंवर नाही तर नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. कामराला चोप दिला पाहिजे, अस संजय शिरसाट म्हणाले. आम्ही ही टीका सहन करणार नाही, पण आमच्यावर कोणी आलं तर सोडणार नाही असा इशाराही शिरसाट यांनी दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List