Sanjay Raut : आताच सुरसुरी का आली? काढून टाका मग दाढ्या, संजय राऊतांचा शिंदेवर हल्ला, फडणवीस यांना आवाहन काय?

Sanjay Raut : आताच सुरसुरी का आली? काढून टाका मग दाढ्या, संजय राऊतांचा शिंदेवर हल्ला, फडणवीस यांना आवाहन काय?

स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराने सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यामुळे शिवसैनिकांना मिरच्या झोंबल्या असून काल आक्रमक शिवसैनिकांनी कुणालचा शो होतो, त्या हॉटेलची तोडफोड केली आहे. एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका करणाऱ्या कुणालविरोधात पोलिसांतही तक्रार देण्यात आली असून त्याने माफी मागितली नाही तर त्याच्या तोंडाला काळं फासण्याचा इशाराही शिवसैनिकांनी दिला आहे. या मुद्यावरून राजकीय वातावरण बरंच तापलेलं असतानाच आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनीही या प्रकरणात प्रतिक्रिया दिली आहे. काल राऊत यांनीच कुणाल कामराचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर करत त्याचं कौतुक केलं होतं.

त्यामुळे राऊतांवरही टीकेची झोड उठली होती. मात्र आतज त्याच संजय राऊतांनी या संपूर्ण मुद्याचा समाचार घेत राज्य सरकारलाच खडेबोल सुनावले आहेत. 50-60 लोकांनी हातात लाठ्या काठ्या घेऊन खार परिसरात ज्या हॉटेलमध्ये स्टुडिओ आहे. ते उद्ध्वस्त केलं. या महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभल्याचं लक्षण आहे. गृहखात्याचा कारभार त्यांना झेपत नाही, त्यांनी गृहखातं सोडावं असं आवाहन राऊत यांनी फडणवीस यांना केलं. नागूपरमधील दंगेखोरांना सोडणार नाही असं फडणवीस म्हणतात, पण काल रात्री खारमध्ये दंगलखोरांनी जे नुकसान केलंय. त्यांना सोडणार की नाही? जे नुकसान झालंय ते नुकसान दंगलखोरांनाकडून भरून घेणार की नाही? असा सवालही राऊतांनी विचारला.

महाराष्ट्र हे गुंडा स्टेट

गृहखात्याच्या चर्चेवर राज्यसभेत जे मी भाषण केलं. त्यात मी अमित शाहांसमोर असं म्हणालो की, या देशाच्या गृहमंत्र्यांनी किंवा अमित शाह यांनी देशाचं पोलीस स्टेट केलं. पोलीस स्टेट म्हणजे पोलिसांच्या दबावाखाली सुरू असलेलं राज्य. महाराष्ट्र त्याला अपवाद आहे. महाराष्ट्र हे गुंडा स्टेट आहे. महाराष्ट्र हे गुंडाराज आहे. संपूर्ण महाराष्ट्राचा बीड करण्याचा काही लोकांनी चंग बांधला आहे. एक बीड नाही. काल मुंबईत कुणाल कामराबाबत एक प्रकार घडला. तो कॉमेडियन आहे. राजकीय व्यंगात्मक टिपण्या करत असतो. त्याने आमच्यावरही केल्या आहेत. आमच्या नेत्यावर केल्या आहेत. काल त्याचं एक गाणं प्रसिद्ध झालंय. पॉडकास्ट झालंय. त्यात तो काय म्हणतोय, ठाणे की रिक्षा, चेहरे पे दाढी, यात कुणाला कुणाच्या लोकांना अस्वस्थ होऊन त्याचा स्टुडिओ फोडून धमक्या देण्याची गरज काय. 50-60 लोकं जातात, हातात लाठ्या काठ्या घेतात. खार परिसरात ज्या हॉटेलमध्ये स्टुडिओ आहे. ते उद्ध्वस्त केलं. या महाराष्ट्राला कमजोर गृहमंत्री लाभल्याचं लक्षण आहे. माझं फडणवीस यांना आवाहन आहे की त्यांनी गृहखातं सोडावं. त्यांना ते झेपत नाही. गृहखात्याचा कारभार त्यांना झेपत नाही. किंवा त्यांना काम करू देत नाही, असे राऊत म्हणाले.

तुमचे पोलीस काय झोपा काढत होते का ?

बीडमध्ये काय चाललंय. परभणीत काय चाललंय किंवा नागपूरला काय झालं. दंगली. आता तुमच्या डोळ्यासमोर राज्याच्या राजधानीत पॉडकास्टरचा स्टुडिओ उद्ध्वस्त केला. पोलीस काय तुमचे झोपा काढत होते? असा संतप्त सवाल राऊत यांनी विचारला. पोलीस काय करत होते. या महाराष्ट्रात सेन्सॉरशीप लावलीय. आणीबाणी लावलीय ? आणीबाणी लावली असेल तर आम्हाला स्पष्ट सांगा, होय आम्ही आणीबाणी लावली. कलाकारांना, लेखकांना आणि साहित्यिकांना, कॉमेडियनला टिकाटिप्पणी करू देणार नाही, लिहू देणार नाही. हे त्यांनी स्पष्ट सांगावं.

खारमध्ये नुकसान करणाऱ्या दंगलखोरांना सोडणार की नाही ?

फडणवीस म्हणाले, नागपूरच्या दंगलखोरांना सोडणार नाही. दंगलखोरांकडून भरपाई करू. काल रात्री खारमध्ये दंगलखोरांनी जे नुकसान केलंय. त्यांना सोडणार की नाही? जे नुकसान झालंय ते नुकसान दंगलखोरांनाकडून भरून घेणार की नाही? असा सवाल राऊतांनी विचारला. हा एक सामान्य जनतेचा सवाल आहे. राज्याच्या राजधानीत तुम्ही गुंडाराज चालवत आहेत. अशा प्रकारची गाणी निवडणुकीत सर्वांवर आलीय. त्या काळातील गाणी पाहा. आता एवढी सुरसुरी काही लोकांना का आली. या गाण्यात कुणाचा उल्लेख नाही. या गाण्यावर लोकं बेभानपणे नाचली. त्याचा राग आला का? मग दाढी काढा तुम्ही? सर्व दाढ्या माझ्याच आहेत असं त्यांच्या समर्थकांना वाटत असेल तर त्यांच्या समर्थकांनी दाढ्या सफाचट करून टाकाव्यात, अशा शब्दांत राऊतांनी एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी प्रशांत कोरटकरला तीन दिवसांची पोलीस कोठडी
छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्ये करणारा आणि इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी...
काश्मिरात संगमनेरचे जवान रामदास बढे शहीद
पश्चिम रेल्वेने भंगार विक्रीतून कमावले 507 कोटी रुपये
पालिका गुढीपाडव्याला पुरणपोळी देणार
30 वर्षे झाली तरी… रेवस ते रेडी सागरी महामार्ग अपूर्णच
कौटुंबिक न्यायालयात ई-फायलिंग करताना तांत्रिक अडचणी, वकिलांचे मुख्य न्यायमूर्तींना पत्र
हे सभागृह प्रशांत बंबच्या बापाचे नाही! अभिजीत वंजारी संतापले