आमिर खानने घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट; मुलगा विराजला मारली मिठी

आमिर खानने घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची भेट; मुलगा विराजला मारली मिठी

बीडच्या मस्साजोग इथले सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनं संपूर्ण राज्याला हादरवून सोडलं. त्यांच्या मारेकऱ्यांना शिक्षा मिळवून देण्यासाठी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख पाठपुरावा करत आहेत. गेल्या काही दिवसांत अनेक राजकीय नेत्यांनी धनंजय देशमुख आणि कुटुंबीयांची भेट घेतली. आता अभिनेता आमिर खानने सुद्धा धनंजय देशमुख यांची भेट घेतल्याचं कळतंय. पाणी फाऊंडेशनच्या कार्यक्रमात आमिरने धनंजय यांची भेट घेतली. यावेळी संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुखसुद्धा उपस्थित होता. या भेटीचा व्हिडीओ समोर आला असून त्यात आमिर हा धनंजय आणि विराज देशमुख यांच्याशी चर्चा करताना दिसून येत आहे. यावेळी आमिरची पूर्व पत्नी किरण रावसुद्धा तिथे उपस्थित होती.

9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करण्यात आल्यानंतर त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. या हत्या प्रकरणात मुख्य सूत्रधार म्हणून माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय समजला जाणारा वाल्मिक कराड याचं नाव समोर आलं. तेव्हापासून संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांकडून आणि विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची आणि या प्रकरणातील आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी जोर धरू लागली होती. त्यानंतर मुंडेंना त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

3 मार्चच्या रात्री संतोष देशमुख यांच्या क्रूरपणे केलेल्या हत्येचे फोटो समोर आले होते. त्यानंतर संपूर्ण राज्यातत संतापाची लाट उसळली. या फोटोंमध्ये आरोपी देशमुख यांना अमानुष मारहाण करताना दिसला. हे फोटो पोलिसांनी त्यांच्या चार्जशीटमध्ये जोडले आहेत. या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला. त्यामुळेच धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला.

संतोष देशमुख यांची हत्या पवनचक्कीच्या वादातून झाल्याचं धनंजय देशमुख यांनी सांगितलं होतं. पोलिसांनी सादर केलेल्या दोषारोपपत्रातदेखील याचा उल्लेख आहे. “6 डिसेंबर रोजी खंडणी मागण्यासाठी आलेल्या काही जणांनी मस्साजोग इथल्या पवनचक्की प्रकल्पाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याची घटना घडली होती. त्या प्रकल्पावर काम करणारे सुरक्षा रक्षक हे मस्साजोग इथले असल्यानं सरपंच संतोष देशमुख यांनी या प्रकरणात मध्यस्थी केली होती. तसंच मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील केली होती. त्याचा राग मनात धरून अपहरणकर्त्यांनी संतोष देशमुख यांची हत्या केली”, असा आरोप धनंजय देशमुखांनी केला.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

पुण्यातील तरुणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार, मित्रासह चौघांवर गुन्हा दाखल पुण्यातील तरुणीवर मुंबईत सामूहिक बलात्कार, मित्रासह चौघांवर गुन्हा दाखल
मूळची कर्नाटकची आणि पुण्यात आयटी कंपनीत नोकरीला असलेल्या तरुणीला शीतपेयातून गुंगीच्या गोळ्या देऊन तिच्यावर चौघांनी अनैसर्गिक अत्याचार केला. त्यानंतर तिचे...
सिग्नलवर गैरवर्तन करणाऱ्या गौरव आहुजाला जामीन
ससून रुग्णालयातून पुन्हा आरोपी पळाला
ठाणे, रिक्षा, चष्मा, दाढी अन् गद्दार शब्दांना बंदी आहे का? पुण्यातील शिवसेनेच्या व्यंगचित्राची चर्चा
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मास्टरमाइंड वाल्मीक कराडच! ऍड. उज्ज्वल निकम यांचा युक्तिवाद; अनेक पुरावे सादर
प्रधानमंत्री आवास योजनेला पैसे कमी पडणार नाहीत
मुंबईत पालिका अधिकाऱ्यांच्या संगनमताने पार्किंग घोटाळा, सुनील प्रभू यांचा आरोप