साफसफाई करताना कुलरचा शॉक लागून दोघी जावांचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

साफसफाई करताना कुलरचा शॉक लागून दोघी जावांचा मृत्यू, कुटुंबावर शोककळा

ईदनिमित्त घराची साफसफाई करत असताना कुलरचा शॉक लागून सख्या जावांचा मृत्यू झाल्याची घटना परभणीत घडली. बिस्मिलाबी इस्माईल शेख आणि शेख जहुराबी शेख युसुफ अशी मयत महिलांची नावे आहेत. पूर्णा तालुक्यातील गौर येथे ही हृदयद्रावक घटना घडली.

ईदचा सण जवळ आला असल्याने शेख कुटुंबातील जाऊबाई बुधवारी दुपारी आपापल्या घराची साफसफाई करत होत्या. सफाई करताना शेख जहूराबी यांचा ओला हात कुलरला लागला. यामुळे त्यांना शॉक बसला. जाऊ कुलरला चिकटली बघून त्यांना वाचवायला बिस्मिलाबी या वाचवायला आल्या.

बिस्मिलाबी यांनी जहूराबी यांचा हात धरुन त्यांना बाजूला करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना देखील शॉक लागला. यात दोघी जावांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच चुडावा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेह ताब्यात घेतले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पूर्णा येथील ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

Gudi Padwa 2025 : नवीन संधी, नव्या स्वप्नांची पूर्ती आणि आनंदाची उधळण; राज्यभरात नववर्षाचा उत्साह, ठिकठिकाणी शोभायात्राचे आयोजन Gudi Padwa 2025 : नवीन संधी, नव्या स्वप्नांची पूर्ती आणि आनंदाची उधळण; राज्यभरात नववर्षाचा उत्साह, ठिकठिकाणी शोभायात्राचे आयोजन
गुढीपाडवा म्हणजे हिंदू नवीन वर्षाचा पहिला दिवस. या दिवसांपासून मराठी नवीन वर्ष सुरु होतं. गुढीपाडवा म्हणजे हिंदू शास्त्रानुसार चैत्र शुद्ध...
साप्ताहिक राशिभविष्य – रविवार 30 मार्च 2025 ते शनिवार 5 एप्रिल 2025
रोखठोक : साला, उखाड दिया!
सायबर विश्व – कॉल मर्जिंग सायबर स्कॅम : स्कॅमरच्या नव्या चलाखीचा पर्दाफाश!
वेधक – आबूधाबीतील लक्ष्मीनारायण मंदिर, अरेबियन मैत्रीचे प्रतीक
विशेष – शिल्पकलेतील सुवर्णमुद्रा
मंथन -सिमन द बो आणि स्त्रीवाद