एकनाथ शिंदे यांच्यावर ‘गद्दार’ असे गाणे, संजय राऊत यांनी ट्विट करत म्हटले ‘कुनाल की कमाल’, आता शिवसेना कॉमेडियनविरोधात आक्रमक
कॉमेडियन कुणाल कामरा यांनी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यावर गाणे गायले आहे. या गाण्याच्या बोलवरुन शिवसेना संतप्त झाली आहे. त्यांनी कॉमेडियन कुणाल कामराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दुसरीकडे शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी हे गाणे ट्विट केले आहे. सोबत ‘कुनाल की कमाल! जय महाराष्ट्र!’, असे लिहिले आहे. दरम्यान या गाण्यात कुणाल कामरा यांनी एकनाथ शिंदे यांना गद्दार संबोधिले आहे. यापूर्वी कुणाल कामरा यांनी अनेक वाद निर्माण केले आहे.
काय आहे गाणे
महाराष्ट्राच्या राजकारणावर कुणाल कामरा बोलतात. शिवसेना शिवसेनेतून बाहेर आली. राष्ट्रवादी राष्ट्रवादीतून बाहेर आली. हा प्रकारात सर्वच कन्फूज झाले. हा प्रकार एकाने सुरु केला होता, असे सांगत गाण्याचे बोल सुरु होतात. ‘ठाणे की रिक्षा चेहर पर दाढी, ऑख पर चष्मा….मेरी नजर से दोखो तो गद्दार नजर आये…. ‘ या गाण्यात त्यांनी थेट एकनाथ शिंदे यांचे नाव घेतले नाही. परंतु आता शिवसेना आक्रमक झाली आहे.
कुनाल की कमाल!
जय महाराष्ट्र! https://t.co/U4Jxdo4dCm— Sanjay Raut (@rautsanjay61) March 23, 2025
शिवसेना आक्रमक, काळे फासण्याचा इशारा
शिवसेना नेते उदय सामंत म्हणाले, कोण हा कुणाल कामरा? जर त्यांनी एकनाथ शिंदे यांच्या विरोधात काही गाणे गायले असेल तर त्याच्या विरोधात शिवसेना आक्रमक होणार आहे. आमचे आमदार मुरजी पटेल हे कुणाल कामरा यांच्या विरोधात पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करतील. त्यांनी माफी मागितली नाही तर शिवसैनिक आक्रमक होतील. शिवसेना नेत्या शीतल म्हात्रे म्हणाल्या, कुणाल कामरा याने आज १२ वाजेपर्यंत माफीनामा मागितला नाही तर संपूर्ण शिवसेना महिला आघाडी कुणाल कामराच्या तोंडाला काळे फासल्याशिवाय राहणार नाही.
दरम्यान, रात्री उशीरा कुणाल कामरा विरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शिवसेना आमदार मुरजी पटेल एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहोचले. कुणाल कामराने विनोदाच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे मुरजी पटेल यांनी तक्रार दिली. एमआयडीसी पोलिसांनी कुणाल कामराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सुरुवात केली आहे.
कुणाल कामरा अन् वाद
कुणाल कामरा आणि वाद समीकरण आहे. काही वर्षांपूर्वी त्यांनी विमानात पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्याशी वाद घातला होता. त्यानंतर त्यांच्यावर प्रवास करण्यास विमान कंपनीने बंदी आणली होती. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाससोबतही कुणाल कामरा यांचा सोशल मीडियावर वाद झाला होता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List