IPL-2025 -CSK vs MI Toss – चेन्नई संघाने नाणेफेक जिंकली; प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय
IPL 2025 टी-20 स्पर्धेतील चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स हे दोन संघ रविवारी समोरासमोर आहेत. या दोन्ही संघात नेहमीच ‘कांटे की टक्कर’ पाहायला मिळते. चेन्नई सुपर किंग्सने आयपीएलच्या 18 व्या मोसमातील आपल्या पहिल्या सामन्यात नाणेफेक जिकंली आहे. आता मुंबईचे फलंदाज चेन्नईसमोर किती धावा करणार? याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष आहे.
Toss from the MA Chidambaram Stadium
@ChennaiIPL won the toss and elected to bowl against @mipaltan
Updates
https://t.co/QlMj4G7kV0 #TATAIPL | #CSKvMI pic.twitter.com/y4Ddqxvr1n
— IndianPremierLeague (@IPL) March 23, 2025
रविवारच्या दुसऱ्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स हे तगडे आणि यशस्वी संघ आमनेसामने आहेत. हा समाना एमए चिदंबरम स्टेडियममध्ये (चेपॉक) खेळवण्यात येत आहे. ,सामन्यापुर्वी 7 वाजता नाणेफेक झाली. चेन्नईने टॉस जिंकला आणि कर्णधार ऋतुराज गायकवाडने क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेत मुंबईला प्रथम फंलदाडी दिली आहे.
मुंबई विरुद्ध चेन्नई दोन्ही संघ आयपीएल स्पर्धेत आतापर्यंत एकूण 37 वेळा एकमेकांविरुद्ध खेळले आहेत.मुंबईने या 37 पैकी सर्वाधिक सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबईने 20 सान्यांत चेन्नईवर मात केली आहे. तर चेन्नईने 17 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच चेन्नईने मुंबईविरुद्ध गेल्या 6 पैकी 5 सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच चेन्नईने मुंबईवर गेल्या 3 सामन्यांत सलग विजय मिळवला आहे. त्यामुळे हा सामना रंगतदार ठरणार आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List