प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लून्सर अन् अभिनेत्रीला जिवंत जाळण्याची धमकी
सोशल मीडिया एन्फ्लून्सर आणि अभिनेत्री एंजेल राय ही सध्या मोठ्या अडचणीत सापडली आहे. एंजेलच्या जीवाला धोका आहे. तसा दावा तिने केला आहे. मला सातत्याने जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. त्यामुळे मी त्रस्त आहे. घाबरलेले आहे. या धमक्यांना घाबरल्याने मी कायदेशीर मदत घेतली आहे. संबंधित व्यक्तीच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली आहे, असं एंजेलने म्हटलंय. एंजेल मुंबईतील बांगूर नगरमध्ये राहते.
एंजेल रायने बांगूर नगर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून कार्यवाही करत अज्ञात व्यक्तीच्याव विरोधात एफआयआर नोंदवला आहे. मला गेल्या काही दिवसांपासून धमकीचे ईमेल येत आहेत. त्याशिवाय मला आपत्तीजनक आणि अश्लील मेसेज पाठवले जात आहे. त्यामुळे मानसिक स्थिती खराब झाली आहे, असं एंजेलने तक्रारीत म्हटलं आहे.
धमकावने सुरूच आहे
एंजेलच्या दाव्यानुसार, आरोपीने तिला जिवंत जाळण्याची आणि गंभीर नुकसान पोहोचवण्याची धमकी दिली आहे. आरोपीने वारंवार या धमक्या दिल्या आहेत. धमकी देणाऱ्याचं वागणं आधी वेगळं होतं. पण नुकतीच घोटाला या वेब सीरीजचा ट्रेलर आल्याने धमक्यांची संख्या अधिक प्रमाणात वाढली आहे, असं तिने म्हटलं आहे.
पोलीसांनी घेतली गंभीर दखल
मला वारंवार धमक्या मिळाल्याने मी घाबरले होते. मी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांनीही या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन भारतीय दंड संहिता (आयपीसी)च्या कलम 75, 78, 79, 351(3), 352, 356(2) आणि आयटी अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. तसेच आरोपीची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहे.
सायबर गुन्हे वाढले
या प्रकरणाने पुन्हा एकदा वाढत्या सायबर आणि ऑनलाइन धमक्यांबाबतची चिंता वाढली आहे. अनेक सेलिब्रिटीज आणि सोशल मीडिया एन्फ्ल्यूएंसर्सना या पूर्वीही धमक्या मिळाल्या आहेत. एंजेलला धमकी देणाऱ्या आरोपीला आम्ही लवकरात लवकर अटक करणार आहोत. त्यासाठी आम्ही डीजिटल फॉरेन्सिक टीमची मदत घेणार आहोत, असं पोलिसांनी सांगितलं.
ऑनलाई धमक्या आल्यास काय करायचं ?
या घटनेनंतर स्वत: एंजेलने तिच्या चाहत्यांना आवाहन केलं आहे. तुम्ही सतर्क राहा आणि कोणत्याही ऑनलाई धमक्या किंवा छळाचा प्रकार आढळल्यास तात्काळ पोलिसांशी संपर्क करा. कायदेशीर मदत घेणं हाच या सर्वांवरचा उपाय आहे. घाबरून गप्प राहण्यापेक्षा त्याविरोधात आवाज उठवला पाहिजे, असं तिने म्हटलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List