‘असे अश्लील कपडे कोण घालून येतं?…’, आयपीएलच्या उद्घाटन समारंभासाठी आलेली दिशा पटानी ड्रेसवरून ट्रोल
आयपीएलच्या उद्घाटन समारंभात दिशा पटानीने तिच्या परफॉर्मसने लोकांची मने जिंकली असताना, तिला ड्रेसवरून मात्र चांगलंच ट्रोल करण्यात येत आहे. सोशल मीडियावरील तिच्या कपड्यांवरून लोकं तिला जास्तच ट्रोल करत आहेत. शनिवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आयपीएल 2025 च्या हंगामाची सुरुवात अतिशय भव्य सोहळ्याप्रमाणे झाली. समारंभात अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. शाहरुखने तर विराटला त्याच्या गाण्यावर डान्सही करायसा लावाला होता. सलमान खानच्या उपस्थितीचीही फार चर्चा झाली. पण या कार्यक्रमात सर्वात जास्त ट्रोल करण्यात आलं ते दिशा पटानीला.
दिशा पटानीला ड्रेसवरून बरंच ट्रोल करण्यात आलं
सुरुवातीला दिशा पटानीनेही तिच्या सादरीकरणाने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं. पण तिच्या ड्रेसवरून तिला बरंच ट्रोल करण्यात आलं. दिशा पटानीच्या ड्रेसवरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे.अनेक युजर्सने तिच्या ड्रेसवरून तिला चांगलंच सुनावलं आहे.
अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिच्या पोशाखावर टीका केली आहे आणि तिने घातलेला ड्रेस हा नक्कीच या सोहळ्यासाठी नव्हता. कारण हा सोहळा कौटुंबिक प्रेक्षकांसाठी अयोग्य असल्याचं म्हटले आहे. आपल्या दमदार नृत्याने स्टेजवर आपली छाप सोडणाऱ्या दिशाने समारंभात आयव्हरी ब्रॅलेट आणि मॅचिंग स्कर्ट परिधान केला होता. चाहत्यांनी तिच्या दमदार डान्सचं तर कौतुक केलं पण अनेकांनी तिच्या ड्रेसवरून संताप व्यक्त केला. आहे. लाखो प्रेक्षकांसमोर अशा पोशाखांना परवानगी दिल्याबद्दल एक्स (पूर्वीचे ट्विटर) वरील लोक भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला म्हणजेच बीसीसीआयलाच दोष देत देताना दिसले.
Disha Patani Performance At IPL Opening Ceremony#IPL #KKRvRCB pic.twitter.com/GfK4DJ4TUL
— 𝗩ɪʀᴀᴛɪᴀɴ
(@Viratian18GOAT) March 22, 2025
दिशाला ड्रेसवरून नेटकऱ्यांकडून बीसीसीआयवर संताप
दिशा पटानीला तिच्या या ड्रेसच्या स्टायलिंगमुळे सोशल मीडियावर खूप ट्रोल केलं जात आहे . एका युजरने लिहिले आहे की, ‘हा सोहळा लहान मुलांपासून ते सर्व कुटुंबे पाहतात हे माहित असतानाही बीसीसीआयने इतक्या अश्लील पोशाखात सादरीकरण करण्याची परवानगी कशी दिली?’ तर दुसऱ्या युजरने लिहिले की, ‘हे क्रीडा स्पर्धेसाठी योग्य नव्हते. तर एकाने आपला राग व्यक्त करत लिहिलं की, “आयपीएल समारंभात अशा कपड्यांना परवानगी देणे योग्य नव्हते” अशा पद्धतीने दिशाला प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. दिशाला तिच्या कपड्यांवरून ट्रोल करण्यात आल्याची ही पहिलीच वेळ नाही तर याआधीही तिला बऱ्याचदा तिच्या कपड्यांच्या स्टाइलवरून ट्रोल करण्यात आलं आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List