धक्कादायक! आधी डिस्नेवर्ल्डला फिरायला नेले नंतर मुलाचा गळा चिरला, आईचे कृत्य पाहून सर्वच हादरले
अमेरिकेतील कॅलिफोर्निया शहरातील एका हिंदुस्थानी वंशाच्या महिलेने तिच्या 11 वर्षाच्या मुलाची गळा चिरून हत्या केली आहे. सरिता रामराजू असे त्या महिलेचे नाव असून तिच्याव फेलोनी काऊंट न्यायालयात हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरिता हिने आधी आपल्या मुलाला डिस्ने वर्ल्डला फिरायला नेले व नंतर त्याचा गळा चिरला.
रामराजू हिचा व तिच्या पतीचा 2018 मध्ये घटस्फोट झाला होता. तेव्हापासून ती कॅलिफोर्नियाला राहायला गेली होती. घटस्फोटानंतर त्यांच्या मुलाचा ताबा सरिताच्या पतीकडे होता. न्यायालयाने ठरवल्याप्रमाणे सरिता ही तिच्या मुलाला भेटायला आली होती. ती मुलाला घेऊन तीन दिवसांसाठी डिस्ने लँडला गेली होती. तीन दिवस फिरल्यानंतर जेव्हा मुलाला पतीकडे परत द्यायची वेळ आली तेव्हा सरिताने धारदार चाकूने त्याचा गळा चिरला. त्यानंतर तिने काही तास मुलाच्या मृतदेहासोबत घालवले व नंतर पोलिसांना फोन करून मुलाच्या हत्येची माहिती दिली तसेच ती देखील आत्महत्या करत असल्याचे सांगितले.
सरिताच्या फोननंतर पोलीस तत्काळ ते राहत असलेल्या हॉटेलवर पोहोचले. तेव्हा मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला सापडला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List