एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली बेपत्ता; नगर शहरात खळबळ

एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली बेपत्ता; नगर शहरात खळबळ

शहर परिसरातून एकाच दिवशी तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याच्या घटनेने केडगाव, तपोवन रोड, नगर तालुक्यातील तांदळी वडगाव हादरले आहे. या प्रकरणी कोतवाली, तोफखाना व नगर तालुका पोलीस ठाण्यात वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

केडगाव उपनगरात राहणारी अल्पवयीन मुलगी (वय 17) 20 मार्चला दुपारी राहत्या घरातून बेपत्ता झाली आहे. तिच्या कुटुंबीयांनी सर्वत्र शोधाशोध केली. मात्र, अद्याप तिचा थांगपत्ता लागलेला नाही. तिच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरातील काही कारणावरून आई आणि मुलीचा किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर फिर्यादी आणि आई दोघी बँकेत गेल्या होत्या. त्यानंतर मुलगी घरातून बेपत्ता झाली. घरात एका कोपऱ्यात ‘मी घर सोडून जात आहे’, असा मजकूर लिहिलेली चिठ्ठी आढळून आली. मुलीचे अपहरण केल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

दुसऱ्या घटनेत नगर तालुक्यातील तांदळी वडगाव शिवारात राहणारी अल्पवयीन मुलगी (वय 16) घरात असताना तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आईने नगर तालुका पोलीस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुरुवारी पहाटे ही घटना घडली आहे.

तिसरी घटना नगर शहरातील तपोवन रोडवर घडली आहे. एक 17 वर्षीय मुलगी कपड्याची बॅग घेऊन 20 मार्चला रात्री 9च्या सुमारास घराच्या पाठीमागील भिंतीवरून उडी मारून निघून गेली आहे. तिला अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची फिर्याद तिच्या आईने तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यापूर्वी डिसेंबर 2024 मध्येही या मुलीस कुणीतरी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेले होते. याबाबत तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती, तेव्हा ती मिळून आली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

मुंबईत खळबळ, चेंबूरमध्ये बिल्डर्सवर अज्ञातांकडून गोळीबार, गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल मुंबईत खळबळ, चेंबूरमध्ये बिल्डर्सवर अज्ञातांकडून गोळीबार, गुन्हे शाखेचे अधिकारी घटनास्थळी दाखल
चेंबूर येथील मैत्री पार्क येथे बांधकाम व्यावसायिक सदरुद्दीन खान यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली...
वडील राष्ट्रवादीत तर मुलगी भाजपात विकास कसा होणार – भाजपा नेत्याची जहरी टीका, महायुतीतच कलह
वय 44 वर्षे, 2 मुलांची आई, पण भल्याभल्या अभिनेत्रींना टाकते मागे; ‘ही’ ग्लॅमरस हिरोईन आहे तरी कोण?
चेंबूरमध्ये बिल्डरच्या कारवर गोळीबार, एक जण जखमी
IPL 2025 – राजस्थानला 58 धावांनी धुळ चारत गुजरातने मारला विजयी चौकार, पहिला क्रमांक पटकावला
सुप्रिया सुळेंचं रस्त्यासाठी उपोषण, अजितदादा नेमकं काय म्हणाले
40 हजार रुपयांसाठी महिलेचा मृतदेह 6 तास अडवून ठेवला,आंदोलनाचा इशारा देताच,काय घडले पाहा ?