मोबाईलवर मॅच बघत एसटी चालवणारा चालक बडतर्फ, प्रवासी सुरक्षेसाठी परिवहनचे कठोर पाऊल; कंपनीला ठोठावला पाच हजारांचा दंड

मोबाईलवर मॅच बघत एसटी चालवणारा चालक बडतर्फ, प्रवासी सुरक्षेसाठी परिवहनचे कठोर पाऊल; कंपनीला ठोठावला पाच हजारांचा दंड

एसटीची ई-शिवनेरी बस चालवताना मोबाईलवर क्रिकेट मॅच बघणे चालकाला चांगलेच महागात पडले. अशा कृत्याचा प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर धोका पोहोचू शकतो. या अनुषंगाने एसटी महामंडळाने कठोर कारवाईचे पाऊल उचलले आणि चालकाला थेट सेवेतून बडतर्फ केले. तसेच संबंधित कंपनीला पाच हजार रुपयांचा दंडही ठोठावला.
दादर येथून स्वारगेटला निघालेल्या खासगी ई-शिवनेरी बसमधील चालक रात्री लोणावळ्याजवळ बस चालवत व्हिडीओ प्रवाशांनी बनवला आणि तो वरिष्ठ प्रशासनाला पाठवला. त्यावर परिवहनमंत्र्यांनी तातडीने नियमानुसार कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार महामंडळाने चालकाला प्रवाशांचा जीव धोक्यात घालून बेशिस्त ड्रायव्हिंग केल्याप्रकरणी बडतर्फ केले. तसेच संबंधित खासगी संस्थेला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला. प्रवासी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महामंडळाने चालकाविरुद्ध बडतर्फीची कठोर कारवाई केल्याची माहिती एसटी महामंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

परिवहन विभागाकडून लवकरच नवी नियमावली
खासगी तसेच प्रवासी वाहतूक करणाऱ्या रिक्षा आणि टॅक्सीचे चालकदेखील कानात हेडफोन घालून गाडी चालवतात. अनेक चालक टॅक्सी वा इतर चारचाकी वाहन चालवताना मोबाईलवर क्रिकेट सामने वा चित्रपट पाहत असतात. याबाबत तक्रारी वाढल्या आहेत. अशा चालकांवर निर्बंध आणण्यासाठी परिवहन विभाग लवकरच नवीन नियमावली निश्चित करणार आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

सी लिंकवर टोल ऑपरेटरला 200 मीटर फरफटत नेले सी लिंकवर टोल ऑपरेटरला 200 मीटर फरफटत नेले
टॅक्सी चालकाने वांद्रे – वरळी सी लिंकवरील टोल बूथ चालकाला 200 मीटर फरफटत नेल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकरणी...
सर्व रुग्णालयांची थकीत बिले देणार
क्रिकेटपटूंसाठी स्वच्छतागृहे बांधा!
युनिव्हर्सल फुटपाथ धोरणाला हरताळ, अंधेरी-कुर्ला रोड सफेद पूल परिसरात रहिवाशांची गैरसोय
इंदूरमध्ये सार्वजनिक टॉयलेटच्या बाहेर कुणाल कामराचे फोटो लावले, संजय राऊत म्हणाले की,’ ये तो अपुन जैसा…
IPL 2025 – चौकार अन् षटकारांच्या आतषबाजीत पंजाबचा विजयी धमाका, गुजरात पराभूत
सोनू निगमच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान दगडफेक, व्हिडीओ व्हायरल