प्रशांत कोरटकरला अटक होणारच, सोमवारी होणार पुढील सुनावणी

छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज व ताराराणी यांचा अपमान केल्याचा आरोप असलेल्या प्रशांत कोरटकरच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याची अटक थांबवण्यास उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट नकार दिला.
कोल्हापूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर कोरटकरने यासाठी हायकोर्टाचे दार ठोठावले. न्या. राजेश पाटील यांच्या एकल पीठासमोर यावर सुनावणी झाली. अटकपूर्व जामीन याचिकेची प्रत आम्हाला मिळाली नसल्याचे अतिरिक्त सरकारी वकील अजय पाटील यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. याचिकेची प्रत सरकारी पक्षाला द्या, असे आदेश न्यायालयाने कोरटकरच्या वकिलाला दिले व ही सुनावणी सोमवार, 24 मार्च 2025 पर्यंत तहकूब केली.
पुढील सुनावणीपर्यंत अटकेपासून संरक्षण द्यावे, अशी विनंती कोरकटकरचे वकील सौरभ घाग यांनी केली. संपूर्ण प्रकरण ऐकल्याशिवाय अटक थांबवण्याचे अंतरिम आदेश देता येणार नाहीत, असे न्या. पाटील यांनी स्पष्ट केले. किमान तोंडी तरी असे आदेश पोलिसांना द्यावेत, अशी विनवणी अॅड. घाग यांनी केली. त्यासही न्यायालयाने नकार दिला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Related Posts
Post Comment
Latest News

Comment List