एसटीच्या विभाग नियंत्रकाची बदली; स्वारगेट अत्याचार प्रकरणानंतर कारवाई
स्वारगेट आगारात तरुणीवर अत्याचार प्रकरणी आता एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर बदलीची कारवाई करण्यात आली असून पुणे विभाग नियंत्रक आणि प्रादेशिक व्यवस्थापकपदी अनुक्रमे अरुण सिया आणि श्रीकांत गभणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
घटनेनंतर काही दिवसांतच आगार व्यवस्थापक जयेश पाटील, कनिष्ठ आगार व्यवस्थापक पल्लवी पाटील व स्थानकप्रमुख मोहिनी ढेरे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. त्यानंतर प्रादेशिक व्यवस्थापक व विभाग नियंत्रकसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यावरती देखील बदलीची कारवाई करण्यात आली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List