‘प्रेमाला वय नसतं’,आमिर खानच्या आधी या सेलिब्रिटींनी वयाच्या 60 अन् 70 वर्षांत केलं लग्न; म्हातारपणी झालं खरं प्रेम

‘प्रेमाला वय नसतं’,आमिर खानच्या आधी या सेलिब्रिटींनी वयाच्या 60 अन् 70 वर्षांत केलं लग्न; म्हातारपणी झालं खरं प्रेम

आमिर खान सध्या त्याच्या नवीन अफेअरमुळे चर्चेत आहे. गौरी स्प्राटसोबतची त्याचं नात आता फार चर्चेत आहे. मुख्य म्हणजे त्यांच्या वयातील अंतरामुळे या दोघांनाही ट्रोल केलं जात आहे. पण आमिर खान आणि गौरी स्प्राट हीच जोडी अशी नाहीये की ज्यांच्या वयात बरीच तफावत आहे. बॉलिवूडमध्ये अशा अनेक जोड्या आहेत ज्यांनी चक्क वयाच्या 60 अन् 70 वर्षांत लग्न केलं आहे. ज्यांना वयाच्या 70मध्येही प्रेम झालं आहे.

ते म्हणतात ना प्रेमाला वयाचं बंधन नसतं असंच काहीस या सर्व सेलिब्रिटींसोबत घडल आहे. बॉलिवूडमध्ये असे अनेक सेलिब्रिटी आहेत जे म्हातारपणात प्रेमात पडले. चला पाहुयात त्या जोड्या कोणत्या आहेत त्या.

सेलिब्रिटींनी 60 अन् 70 वर्षांत केलं लग्न

कबीर बेदी: या यादीत पहिले नाव कबीर बेदी यांचे आहे. तीन अयशस्वी लग्नांनंतर, कबीर बेदी यांनी त्यांच्या 70 व्या वाढदिवसाच्या एक दिवस आधी चौथ्यांदा लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं. कबीर बेदी यांची चौथी पत्नी परवीन दोसांझ आहे, जी त्यांची मुलगी पूजा बेदीपेक्षा फक्त 3 ते 4 वर्षांनी लहान आहे. कबीर आणि परवीन यांच्या वयात 30 वर्षांचा फरक आहे. कबीर यांना चौथ्या लग्नानंतर बरंच ट्रोल केलं गेलं आहे.

नीना गुप्ता: त्यानंतर दुसरं नाव आहे अभिनेत्री नीना गुप्ता. नीना गुप्ताही त्यांच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत राहिल्या आहेत. त्या विवियन रिचर्ड्ससोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये होत्या तेव्हा. तेव्हा त्या दोघांना एक मुलगीही झाली. पण ते दोघेही नंतर वेगळे झाले. मग नीना यांनी लेकीला एकटीनेच वाढवले. त्यानंतर त्यांनी वयाच्या 54 व्या वर्षी विवेक मेहरासोबत लग्न केलं.

हंसल मेहता: चित्रपट दिग्दर्शक हंसल मेहता यांनी देखील वयाच्या 54 व्या वर्षी सैफीना हुसेनशी लग्न करून सर्वांना आश्चर्यचकित केलं होतं. 17 वर्षे रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनीही लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मिलिंद सोमण: फिटनेस फ्रीक मिलिंद सोमणने वयाच्या 52 व्या वर्षी त्याच्यापेक्षा 26 वर्षांनी लहान असलेल्या अंकिता कोंवरशी लग्न केले. दोघांच्या लग्नाची बरीच चर्चाही झाली होती.

आशिष विद्यार्थी : दाक्षिणात्य आणि बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते आशिष विद्यार्थी यांनी वयाच्या 60 व्या वर्षी गुपचूप दुसरं लग्न केलं. ते आसाममधील रहिवासी असून रूपाली बरुआसोबत लग्न केलं. रुपालीपूर्वी आशिषचे लग्न अभिनेत्री राजोशी विद्यार्थीशी झाले होते.

मनोज तिवारी: भोजपुरी चित्रपट अभिनेता, गायक आणि राजकारणी मनोज तिवारी यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतल्यानंतर 2020 मध्ये सुरभी तिवारीशी दुसरं लग्न केलं. त्यावेळी त्यांचे वय 50 वर्ष होते.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

CIDमधील ACP प्रद्युम्न यांचा प्रवास खरंच संपणार? शिवाजी साटम यांनीच सांगितलं सत्य… CIDमधील ACP प्रद्युम्न यांचा प्रवास खरंच संपणार? शिवाजी साटम यांनीच सांगितलं सत्य…
CID मालिकेला वेगळ्या परिचयाची गरज नाही. सुमारे 20 वर्षांपासून सुरू असलेला हा प्रसिद्ध हिट थ्रिलर शो प्रत्येकाच्या आयुष्याचा एक भाग...
Manoj Kumar Death: रुद्राक्ष, साईबाबांची विभूती आणि…, मनोज कुमार यांच्या अंत्यदर्शनासाठी रवीनाने आणल्या 3 गोष्टी
माणिकराव कोकाटे म्हणजे कृषिक्षेत्रातील कुणाल कामरा झालेत; रोज शेतकऱ्यांची खिल्ली उडवताहेत, संजय राऊत यांचा हल्लाबोल
मोदी ट्विटर PM, सोशल मिडिया हा त्यांचा वेगळा देश; ‘टॅरिफ वॉर’वरील मौनावरून संजय राऊत यांची घणाघाती टीका
सुंदर दिसण्यासाठी नाकाची केली सर्जरी, नंतर ओळख निर्माण करण्यासाठी नवऱ्यालाही सोडले…
टॅरिफ ही तर श्रीमंत होण्याची संधी, बदलांच्या काळात आर्थिक दुर्बल संपतील; शेअर बाजारातील घसरणीबाबत ट्रम्प यांचे धक्कादायक विधान
मुलांना सोशल मीडिया बंदी कोर्ट घालू शकत नाही, संसदेला कायदा करायला सांगा; सर्वोच्च न्यायालयाने याचिका फेटाळली