टोस्टेड की साधा ब्रेड? कोणता आहे आरोग्यासाठी उत्तम?

टोस्टेड की साधा ब्रेड? कोणता आहे आरोग्यासाठी उत्तम?

आजकाल नाश्त्यात ब्रेड खाणे सर्वात सामान्य गोष्ट बनली आहे. काही लोक साधी ब्रेड पसंत करतात, तर काही टोस्ट करून खातात. पण कधी तुम्ही विचार केला आहे का, की आरोग्याच्या दृष्टीने कोणता पर्याय अधिक फायदेशीर आहे? टोस्ट केल्यामुळे ब्रेडच्या पोषक घटकांमध्ये काही बदल होतात का? आणि या बदलांचा वजनावर किंवा आरोग्यावर काय परिणाम होतो? जर तुमचं मन देखील या प्रश्नांनी गोंधळलं असेल, तर चला, जाणून घेऊया की टोस्ट केलेला ब्रेड आणि साधी ब्रेड यामधील फरक व तुमच्या आरोग्यसाठी काय चांगले असू शकते

टोस्ट केल्याने ब्रेडच्या पोषक तत्त्वांमध्ये काय बदल होतात?

ब्रेड टोस्ट केल्यावर तिच्यातील आर्द्रता कमी होते, ज्यामुळे ती हलकी आणि कुरकुरीत बनते. मात्र, याचा थेट परिणाम ब्रेडच्या कॅलोरी आणि पोषकतत्त्वांवर होत नाही, पण काही छोटे बदल नक्कीच होतात. चला जाणून घेऊया.

ग्लायसेमिक इंडेक्स (GI) कमी होतो: साध्या ब्रेडच्या तुलनेत टोस्ट केलेल्या ब्रेडचा GI स्तर थोडा कमी असतो, म्हणजेच ती रक्तातील साखर हळूहळू वाढवते. त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांसाठी हा पर्याय फायदे शीर ठरू शकतो.

  • काही प्रमाणात स्टार्चचे ब्रेकडाउन होते.
  • टोस्ट केल्याने ब्रेडमधील स्टार्च थोडासा बदलतो, ज्यामुळे ती पचायला सोपी होते.
  • कॅलोरीमध्ये मोठा फरक पडत नाही
  • काही लोकांना वाटते की ब्रेड टोस्ट केल्याने तिच्या कॅलोरी कमी होतात, पण तसे होत नाही. टोस्टिंगमुळे फक्त आर्द्रता कमी होते, कॅलोरी नाही.

वजन कमी करण्यासाठी कोणता ब्रेड चांगली आहे?

जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर साधी किंवा टोस्ट केलेली ब्रेड यापैकी कोणतीही विशेष प्रभावी ठरणार नाही, जोपर्यंत तुम्ही योग्य प्रकारची ब्रेड निवडत नाही.
जर तुम्हाला लवकर भूक लागत असेल, तर ब्राउन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड थोडीशी टोस्ट करून खाणे चांगले ठरेल, कारण त्यामुळे पचनाची गती कमी होईल आणि पोट जास्त वेळ भरलेले राहील.

जर तुम्ही ब्लड शुगर नियंत्रित करू इच्छित असाल, तर टोस्ट केलेली ब्रेड चांगला पर्याय ठरू शकते, कारण तिचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असतो.

जर तुम्ही ब्रेडवर भरपूर लोणी, जॅम किंवा बटर लावत असाल, तर साधी ब्रेड असो किंवा टोस्टेड, दोन्ही वजन वाढवू शकतात. त्यामुळे ब्रेडसोबत काय खाता याकडेही लक्ष द्या.

पोटाच्या समस्या असल्यास कोणता ब्रेड फायदेशीर आहे?

  • जर तुम्हाला अॅसिडिटी, पोट फुगणे किंवा पचनाशी संबंधित अडचणी येत असतील, तर योग्य प्रकारची ब्रेड निवडणे गरजेचे आहे.
  • अॅसिडिटी असल्यास टोस्टेड ब्रेड खा: टोस्ट केल्याने ब्रेडमधील स्टार्च काही प्रमाणात तुटतो, त्यामुळे ती पोटासाठी हलकी होते आणि अॅसिडिटी कमी करण्यास मदत करू शकते.
  • जर पचन धीमे असेल, तर साधी ब्रेड चांगली ठरू शकते: टोस्टिंगमुळे ब्रेड हलकी होते, पण तुम्हाला जास्त ऊर्जा हवी असेल, तर साधी ब्रेड खाणे अधिक फायदेशीर ठरेल.

चव आणि टेक्सचरमध्ये काय चांगले आहे?

  • टोस्टेड ब्रेड: हलकी, खमंग आणि कुरकुरीत असते, ज्यामुळे ती खाण्याचा आनंद वाढतो.
  • साधी ब्रेड: मऊ असते आणि सँडविच किंवा ब्रेड रोलसाठी विविध प्रकारे वापरली जाऊ शकते.
  • जर तुम्हाला कुरकुरीत पदार्थ आवडत असतील, तर टोस्टेड ब्रेड अधिक चांगली वाटेल, पण जर तुम्हाला मऊ टेक्सचर हवे असेल, तर साधी ब्रेड निवडा.

कोणता ब्रेड खावा?

टोस्टेड ब्रेड आणि साधी ब्रेड दोन्हींचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. जर तुम्ही मधुमेहाचे रुग्ण असाल किंवा ब्लड शुगर नियंत्रित करू इच्छित असाल, तर टोस्टेड ब्रेड चांगला पर्याय ठरू शकतो. जर तुम्हाला अधिक ऊर्जा आणि फायबर हवे असेल, तर ब्राउन ब्रेड किंवा मल्टीग्रेन ब्रेड निवडा.

जर तुम्ही हेल्दी ब्रेकफास्ट शोधत असाल, तर साध्या ब्रेडऐवजी ब्राउन ब्रेड हलकीशी टोस्ट करून खा आणि त्यासोबत हेल्दी टॉपिंग्ज जसे की पीनट बटर, एवोकाडो किंवा उकडलेले अंडे जोडा. यामुळे तुमचा ब्रेकफास्ट अधिक पौष्टिक बनेल आणि तुम्हाला दीर्घकाळ ऊर्जा मिळेल.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरेंवर नेमका आरोप काय? याचिकेत कुणाकुणाचा उल्लेख? वाचा A टू Z दिशा सालियनप्रकरणी आदित्य ठाकरेंवर नेमका आरोप काय? याचिकेत कुणाकुणाचा उल्लेख? वाचा A टू Z
दिशा सालियन हिच्या हत्येप्रकरणात आता नवीन ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. दिशा सालियन हिचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली...
नागपूर पेटवून सरकार पार्ट्या करत आहे; हर्षवर्धन सपकाळ यांची महायुती सरकारवर टीका
Manipur Violence – मणिपूर अशांतच! चुराचंदपूरमध्ये पुन्हा हिंसाचार, एकाचा मृत्यू तर अनेक जखमी
MPSC परीक्षेसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, आयोगासंदर्भात म्हणाले…
मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात मोठं ट्विस्ट, वडिलांची हायकोर्टात धाव
रिल बनवणाऱ्या सरकारी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची घोषणा, मुख्यमंत्र्यांनी थेट सांगितले…
जयंत पाटलांचा ‘तो’ प्रश्न, फडणवीसांचं उत्तर; नितेश राणेंना नेमका काय दिला सल्ला?