WOW! तृप्ती डिमरीचे गाव पाहिलंत का?आहे खूपच सुंदर; अभिनेत्रीने शेअर केले फोटो
सध्या शहरातील जीवनशैली फारच व्यस्त आणि धावपळीची आहे. अशा परिस्थितीत, लोक गर्दीपासून दूर शांततेत वेळ घालवण्यासाठी डोंगर माथ्याच्या ठिकाणी किंवा गावी जातात. कारण गावातील वातावरण स्वच्छ आणि शांत असतं. मोकळी हवा असते. तिथलं राहणीमान आणि जेवणही अगदी साधं पण पौष्टिक असतं. त्यामुळे बरेच लोक वर्षातून एकदा-दोनदा किंवा वेळ मिळेल तसं निवांत वेळ घालवण्यासाठी गावी नक्कीच जातात.
तृप्ती डिमरीचं गाव आहे खूपच सुंदर
सामान्य लोकांप्रमाणेच, बॉलिवूड स्टार्सनाही त्यांच्या गावांमध्ये वेळ घालवायला आवडतं. यामी गौतम, कंगना राणौत आणि अनेक बॉलिवूड अभिनेत्री त्यांच्या गावी सुट्टी घालवण्यासाठी जातात आणि तिथले फोटो त्यांच्या सोशल मीडियावर ते शेअर करतात. दरम्यान, बॉलिवूड अभिनेत्री तृप्ती डिमरीनेही तिच्या सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यामध्ये ती तिच्या गावात सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. ती उत्तराखंडची रहिवासी आहे. शहराच्या गर्दीपासून दूर तिचं हे गावं आहे. तिच्या गावाचं नाव आहे काकोडाखल. तुम्ही देखील येथे भेट देण्यासाठी नक्की येऊ शकता.
काकोडाखल गाव
तृप्ती डिमरी ही उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील काकोडाखल गावची रहिवासी आहे. हे गाव खूप सुंदर आहे. येथे तुम्हाला निसर्गाच्या सानिध्यात वेळ घालवण्याची संधी मिळेल. येथील हिरवळ, नद्या आणि टेकड्या पर्यटकांना आकर्षित करतात. निसर्गप्रेमी, फोटोग्राफीसाठी, शूटसाठी तसेच ट्रेकिंगची आवड असलेले लोक आणि मुख्य म्हणजे निवांत वेळ घालवण्यासाठी तुम्ही नक्कीच इथे येऊ शकतात.
काकोडाखालला कसं पोहोचायचं?
काकोडाखालला जाण्यासाठी, जॉली ग्रँट विमानतळावर पोहोचा. ते कालीमठपासून सुमारे 200 किलोमीटर अंतरावर आहे. विमानतळावरून रुद्रप्रयागला जाण्यासाठी टॅक्सी घ्यावी लागते. यानंतर, तुम्ही रुद्रप्रयागहून टॅक्सीने काकोडाखलला पोहोचू शकता.
गावाजवळील भेट देण्याची ठिकाणे कोणती
जर गावाजवळ भेट देण्याबद्दल बघायचं असेल तर तुम्ही रुद्रप्रयाग शहराला भेट देऊ शकता. याशिवाय, काकोडाखाल ते रुद्रप्रयाग संगम हे अंतर सुमारे 20 किलोमीटर आहे. अशा परिस्थितीत तुम्ही या ठिकाणी भेट देऊ शकता. हे अलकनंदा आणि मंदाकिनी नद्यांचे संगम आहे. रुद्रप्रयागमधील भेट देण्यासाठी ऑगस्टमुनी हे देखील एक उत्तम ठिकाण आहे.
याशिवाय, बद्रीनाथ धाम आणि केदारनाथ धाम, गंगोत्री आणि यमुनोत्री धाम देखील येथून खूप जवळ आहेत. रुद्रप्रयाग ते केदारनाथ धाम हे अंतर 80 ते 69 किलोमीटर आहे. रुद्रप्रयाग ते बद्रीनाथ धाम हे अंतर सुमारे 150 किलोमीटर आहे. रुद्रप्रयाग ते गंगोत्री अंतर सुमारे 270 किलोमीटर आहे, तर येथून यमुनोत्री धाम अंतर सुमारे 230 किलोमीटर आहे. तर तुम्हीही अशाच नवीन ठिकाणी जाण्याचा प्लान करत असाल तर हे ठिकाण नक्कीच निवडू शकता.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List