पादचाऱ्यांचा किंमती ऐवज घेऊन पसार होणारी दुकली गजाआड

पादचाऱ्यांचा किंमती ऐवज घेऊन पसार होणारी दुकली गजाआड

एका 63 वर्षीय वृद्धेला फसवून तिच्या अंगावरील सोन्याचे दागिने शिताफीने काढून घेत दोघे पसार झाले; पण मुलुंड पोलिसांनी दोन्ही आरोपींना पकडून गुह्यात वापरलेली दुचाकी हस्तगत केली आहे.

लीला शेट्टी या वृद्धा एम.जी. मार्गावरून जात असताना त्यांना दोघांनी रस्त्यात अडवले. पत्ता विचारण्याचा बहाणा करत लीला यांना बोलण्यात गुंतवून ठेवले. “ आपको जो तकलीफ है, मै जानता हू., मै आपकी तकलीफ दूर कर सकता हू. मै वाराणसी से आया हू असे त्यांना सांगू लागले. तसेच  ‘आपसे एक गलती हुई है, इसिलिऐ लक्ष्मी आपसे नाराज है, पर मै आपको इलाज बताता हू।’ असे भावनिक करत लीला यांना त्यांच्या अंगावरील दागिने पर्समध्ये काढून ठेवण्यास सांगितले. मग ती पर्सच घेऊन आरोपी पसार झाले. लीला यांनी तक्रार दिल्यानंतर मुलुंड पोलिसांनी तपास करत इरफान इमदाद शेख (25) आणि फिरोझ खैरुद्दीन (42) असे दोघांना पकडले. इरफान उत्तराखंड, तर फिरोझ यूपीचा आहे. दोघेही सराईत गुन्हेगार आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

ट्रम्प यांना आवडली टेस्लाची कार! ट्रम्प यांना आवडली टेस्लाची कार!
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  यांनी टेस्ला कंपनीची कार खरेदी केली. ही कार लाल रंगाची असून टेस्ला मॉडल एक्सची कार आहे....
इन्फोसिसचे शेअर्स धडाम! मूर्ती यांच्या कुटुंबाचे 6800 कोटींचे नुकसान
’मुन्नाभाई’कडे एमबीबीएस’च्या 21 पदव्या! डी. फार्माच्या 9 तर युनानी, आयुर्वेदाचीही बनावट डिग्री
70 टक्के गरीब कैद्यांकडे जामिनासाठी पैसेच नाहीत!
Daily Horoscope – दैनिक राशिभविष्य – 13 मार्च 2025, जाणून घ्या कसा असेल आजचा दिवस
कोरटकरला कोर्टात प्रत्यक्ष हजर न राहण्याची मुभा, 17 मार्चपासून कोल्हापूर न्यायालयात सुनावणी
मल्हार सर्टिफिकेशनला खंडोबा देवस्थानचा पाठिंबा, ग्रामस्थ मंडळाचा मात्र विरोध