देशाचा नव्हे, हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू; एम. के. स्टॅलिन यांची टीका

देशाचा नव्हे, हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू; एम. के. स्टॅलिन यांची टीका

हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू आहे. त्यात देशाचा विकासाचा त्यात मागमूस नाही, अशा शब्दांत तामिळनाडूचे मुखअयमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी राष्ट्रीय शिक्षण धोरणाला विरोध केला. तसेच दक्षिणेकडील राज्यांवर सक्तीने हिंदी लादण्याचा प्रकार असल्याची टीका त्यांनी भाजपवर केली. राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा उद्देश देशाच नव्हे तर हिंदीचा विकास करणे हा आहे, असेही ते म्हणाले. तसेच त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यावर हल्लाबोल केला.

तामिळनाडू आणि केंद्र यांच्यातील भाषिक वाद वाढत आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या नावाखाली भाजप दक्षिणेकडील राज्यावर ‘हिंदी लादण्याचा’ प्रयत्न करत आहे, असा आरोप स्टॅलिन यांनी केला. देशाऐवजी ही हिंदीचा विकास करण्याची योजना आहे, असे ते म्हणाले. तिरुवल्लूरमधील एका कार्यक्रमात बुधवारी स्टॅलिन यांनी NEP वर हल्ला चढवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाचा विकास करण्यात अयशस्वी ठरले, असेही त्यांनी सांगितले.

आम्ही या धोरणाचा विरोध करत आहोत कारण ते तामिळनाडूच्या शिक्षण व्यवस्थेला पूर्णपणे नष्ट करणार आहे. केंद्राने त्यांचे शिक्षण धोरण लागू होईपर्यंत राज्य चालवल्या जाणाऱ्या शाळांसाठी 2,150 कोटी रुपयांचा निधी नाकारणे हा देशाच्या संघराज्यीय रचनेवर हल्ला आहे. केंद्र राज्यांचे आणि संघराज्यीय रचनेचे अधिकार नष्ट करण्यासाठी हुकूमशाहीसारखे वागत आहे, असा आरोप त्यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपवर केला.

तामिळनाडूतील निवडणुकीतील पराभवासाठी भाजप राजकीय सूड घेत असल्याचा आरोपही त्यांनी केला. आम्ही आमच्या करांचा वाटा मागत आहोत. या धोरणासाठी 43 लाख शाळांचा निधी अडवणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. राज्याची शैक्षणिक घडी बिघडवणारे आणि सक्तीने हिंदी लादणारे हे धोरण आहे. त्यामुळे त्याला आमचा ठाम विरोध असल्याचेही स्टॅलिन यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

भांडुप पश्चिम परिसरातील  75 अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर भांडुप पश्चिम परिसरातील  75 अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर
मुंबई महानगरपालिकेच्या एस विभाग हद्दीतील भांडुप पश्चिम परिसरातील कक्कय्या शेट्टी मार्गावरील 75 अनधिकृत बांधकामे आज निष्कासित करण्यात आली आहेत. यामध्ये...
पादचाऱ्यांचा किंमती ऐवज घेऊन पसार होणारी दुकली गजाआड
विदेशी मद्याची तस्करी पकडली, अ‍ॅण्टॉप हिल पोलिसांची कारवाई
अभिनेत्रीच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
देशाचा नव्हे, हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू; एम. के. स्टॅलिन यांची टीका
होळी आणि धुलीवंदनात रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी कडकोट बंदोबस्त, शहराला येणार छावणीचे स्वरुप
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? अधिवेशनातून सर्वात मोठी बातमी समोर