Sambhaji Nagar News – पोलीस अंमलदाराने वाचवले भाजी विक्रेत्याचे प्राण, आयुक्तांकडून कौतुक

Sambhaji Nagar News – पोलीस अंमलदाराने वाचवले भाजी विक्रेत्याचे प्राण, आयुक्तांकडून कौतुक

ह्रदयविकाराचा तीव्र झटका आल्यानंतर कशी काळजी घ्यावी याबाबत पोलीस अधिकारी-कर्मचार्‍यांना पोलीस आयुक्तालयाकडून सीपीआरचे प्रशिक्षण देण्यात आले होते. या प्रशिक्षणाच्या बळावर एका पोलीस अंमलदाराने ह्रदयविकाराचा झटका आलेल्या भाजीविक्रेत्याचे प्राण वाचवले. या कार्यतत्परतेमुळे प्राण वाचल्याने पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी अंमलदाराचे अभिनंदन केले.

पोलीस आयुक्तालयातील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षात कार्यरत असलेले पोलीस अंमलदार रामदास बबनराव गव्हाणे हे कर्तव्यावर जात होते. मंगळवारी दुपारी दीड वाजता रस्त्यात भाजी विक्रेता रामकिसन श्रीधरराव सुलक्षणे (40, रा. पेशवे नगर) यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. ही बाब गव्हाणे यांच्या लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान राखून तत्काळ सीपीआर देऊन त्यांना सिग्मा हॉस्पिटल येथे बेशुद्ध अवस्थेत दाखल केले. त्यामुळे सुलक्षणे यांचा जीव वाचला.

पोलीस अंमलदार रामदास गव्हाणे यांच्या या उल्लेखनीय कार्याचे मनःपूर्वक कौतुक करून पोलीस आयुक्त प्रवीण पवार यांनी त्यांचा सत्कार केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

देशाचा नव्हे, हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू; एम. के. स्टॅलिन यांची टीका देशाचा नव्हे, हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू; एम. के. स्टॅलिन यांची टीका
हिंदीचा विकास हाच राष्ट्रीय शिक्षण धोरणाचा हेतू आहे. त्यात देशाचा विकासाचा त्यात मागमूस नाही, अशा शब्दांत तामिळनाडूचे मुखअयमंत्री एम. के....
होळी आणि धुलीवंदनात रंगाचा बेरंग होऊ नये यासाठी कडकोट बंदोबस्त, शहराला येणार छावणीचे स्वरुप
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधीपासून मिळणार? अधिवेशनातून सर्वात मोठी बातमी समोर
पीओपी मूर्तींवरील बंदीबाबत सरकारने न्यायालयात फेरयाचिका दाखल करावी, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंची मागणी
Sambhaji Nagar News – पोलीस अंमलदाराने वाचवले भाजी विक्रेत्याचे प्राण, आयुक्तांकडून कौतुक
मेहुणीवर जीव जडला, मग क्राईम शो पाहून साडूचा काटा काढला; एकतर्फी प्रेमाचा धक्कादायक अंत
Ratnagiri News – हुरा रे हुरा… आमच्या भैरीबुवाला सोन्याचा तुरा रे…. कोकणात शिमगोत्सवाची धूम