अभिनेत्रीच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला
छोटय़ा पडद्यावर काम करणाऱ्या एका अभिनेत्रीच्या सहा वर्षांच्या मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न एकाने केला. अपहरणाचा प्रयत्न करणाऱ्याला गोरेगाव पोलिसांनी अटक केली. त्याचा अपहरणाचा नेमका काय हेतू होता हे स्पष्ट झालेले नाही. पोलीस त्याची कसून चौकशी करत आहेत.
तक्रारदार अभिनेत्रीची मुलगी गोरेगाव परिसरातील एका खासगी शाळेत शिकते. शाळा सुटल्यानंतर ती गाण्याच्या क्लासेसला जाते. नुकतीच अभिनेत्री ही सायंकाळी तिच्या मुलीला घेण्यासाठी गेली होती. तिचा क्लास सुटला नसल्याने ती बाहेर उभी होती. काही वेळाने क्लास सुटला. क्लास सुटल्यावर तेथे काही मुले खेळत होती. त्याचदरम्यान क्लास घेणारी एक शिक्षिका तिच्याजवळ आल्या. तुमच्या मुलीला नेण्यासाठी कोणी आले आहे का, अशी तिने विचारणा केली.
एकजण तेथे उभा असून तो मुलीला नेणार असल्याचे अभिनेत्रीला सांगण्यात आले. त्यानंतर अभिनेत्री आणि शिक्षिका या तेथे गेल्या. त्यांनी त्याला विचारणा केली. त्याने गोरेगाव येथे काम करत असल्याचे सांगितले. त्याची सत्यता पडताळणीसाठी त्याला तेथे नेले. त्याच्याविरोधात तक्रार देण्याचे अभिनेत्रीने ठरवले. तिने पोलीस नियंत्रण कक्षात पह्न केला. पोलीस येण्यास उशीर होत असल्याने तिने त्याला गोरेगाव पोलीस ठाण्यात नेले. अभिनेत्रीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला. गुन्हा नोंद होताच पोलिसांनी त्याला अटक केली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List