स्वपक्षाच्या आमदारालाच पालकमंत्र्यांनी पाडले तोंडघशी; भाजपची झाली अडचण
चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेवरून पालकमंत्री आणि भाजप आमदार यांच्यातील मतभिन्नता सर्वांसमोर आली आहे. त्यामुळे कोण खरं बोलत आहे, असा प्रश्न जनतेला पडलाय. चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांनी सभागृहात बोलताना चंद्रपूर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडल्याचे सांगितले. पोलिसांवर झालेला जीवघेणा हल्ला, काँग्रेस नेत्याच्या घरावर झालेला गोळीबार, अमली पदार्थांची आवक, वाढती गुन्हेगारी यावर जोरगेवार यांनी बोट ठेवले. ही वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी पोलिस प्रशासनात फेरबदल करण्याची मागणी केली.
जोरगेवार यांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रश्नाला चंद्रपूरचे पालकमंत्री प्रा. अशोक उईके यांनी चक्क फेटाळून लावले आणि आपल्याच पक्षाच्या आमदाराला तोंडघशी पाडले. चंद्रपूर जिल्ह्यात कायदा सुव्यवस्था उत्तम असून, पोलिस आपले काम करीत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. आमदार आणि पालकमंत्र्यांच्या बोलण्यातील ही विसंगती भाजपला अडचणीची ठरली आहे. मंत्री आणि आमदारांमध्ये कोणताही समन्वय नसून एकमेकांना तोंडघसी पाडण्यात येत असल्याचेही दिसून आले आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List