विदेशी मद्याची तस्करी पकडली, अॅण्टॉप हिल पोलिसांची कारवाई
होळी आणि धुळवड जोशात साजरी करण्यासाठी विदेशी मद्याचा स्टॉक करण्याचा अॅण्टॉप हिल येथील काही तरुणांचा प्रयत्न फसला. या तरुणांच्या घरापासून काही अंतरावर कारमधून आणलेला दारूचा साठा पोलिसांनी ताब्यात घेतला.
पंजाबी कॅम्प परिसरात सपोनि शिवाजी मदने व त्यांचे पथक गस्त घालत असताना त्यांना माहिती मिळाली की, एका कारमधून बेकायदेशीररित्या विदेशी मद्याची तस्करी करण्यात येत आहे. त्यानुसार पथकाने शीव कोळीवाडा येथील प्लॅक मार्गावर एक स्कोडा कार थांबवली. कारमध्ये असलेल्या बॉक्सेसबाबत चालकाला विचारले असता त्यात विदेशी मद्य असल्याचे त्याने सांगितले. बेकायदेशीरपणे हा साठा घेऊन जात असल्याचे निष्पन्न होताच पोलिसांनी कार चालक अभिषेक भोईर (27) याला ताब्यात घेतले. तसेच मद्याचा साठा व कार जप्त करण्यात आली.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List