Benefits Of Body Massage- नियमित शरीराला मसाज करा, ताण तणावापासून राहाल कायमचे दूर… वाचा मसाज करण्याचे फायदे
शरीर म्हटल्यावर ते थकणारच, उत्तम आणि निरोगी शरीरासाठी केवळ बाह्य सौंदर्य असून चालत नाही. तर त्यासोबतीला आपल्याला मानसिक आरोग्याचीही खूप गरज असते. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यासाठी शरीराची योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. यावर एक उत्तम उपाय म्हणजे मसाज. शरीराला नियमित मसाज केल्यामुळे, शरीराची कांती सुधारते. त्याचबरोबर इतर अनेक आरोग्याचे लाभ होतात.
शरीराला नियमित बाॅडी मसाज केल्यामुळे कोर्टिसोलची पातळी कमी होते. कोर्टिसोल हे असे हार्मोन आहे ज्यामुळे आपल्याला तणाव जाणवत असतो. नियमित बाॅडी मसाज केल्यामुळे, कोर्टिसोल हे खूप प्रमाणात कमी होते. म्हणूनच मसाजनंतर झोपही छान लागते. चला तर आपण जाणून घेऊया, नियमित बाॅडी मसाज केल्याचे फायदे.
नियमित बाॅडी मसाजचे फायदे
नियमित बाॅडी मसाज केल्यामुळे, शरीराला खूप सारे फायदे मिळतात. यातील पहिला फायदा म्हणजे उत्तम आणि शांत झोप लागते.
बाॅडी मसाजमुळे शरीराचे दुखणे थांबून, शरीर रिलॅक्स व्हायला मदत होते.
बाॅडी मसाज केल्यामुळे मनातील सर्व चिंता दूर होऊन, सकारात्मक वाटू लागते.
रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासाठी बाॅडी मसाज हा खूप महत्त्वाचा मानला जातो. यामुळे अनेक आजारांपासून मुक्तता होते.
शरीराची झीज भरुन काढण्यासाठी बाॅडी मसाज हे खूप उपयुक्त मानले गेले आहे. गरोदरपणात झालेली झीज भरून काढण्यासाठी सुद्धा मसाज हा उपयुक्त मानला जातो.
मसाज केल्यामुळे धमन्यांनाही आराम मिळतो, तसेच नसांनाही आराम मिळतो.
योग्य पद्धतीने मसाज केल्यामुळे, मेंदू आणि शरीर दोन्ही रिलॅक्स व्हायला मदत मिळते.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List