पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघात

पुण्यात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाला, या घटनेमुळे राज्यातील सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली असा घणाघात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला. तसेच लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करत आहे असेही सपकाळ म्हणाले.

आज मुंबईत सपकाळ यांनी पत्रकार परिषद घेतली. तेव्हा सपकाळ म्हणाले की, मध्यंतरी मुंबईत शाळकरी मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेने महाराष्ट्र हादरला होता पण त्यातील सत्य बाहेर येऊ नये म्हणून सरकारने आरोपीचा एन्काऊंटर करून प्रकरणातील मुख्य सुत्रधारांना वाचवण्याचाच प्रयत्न केला. सर्वच विषयावर बोलणारे राज्याचे मुख्यमंत्री महत्वाच्या विषयावर मात्र जाणीवपूर्वक गप्प बसतात. पुण्यात झालेल्या बलात्काराच्या घटनेने महाराष्ट्र पुन्हा हादरला आहे. दिल्लीत 11 वर्षापूर्वी एका तरुणीवर बलात्कार झाल्याने समाजातून संतप्त भावना व्यक्त झाल्या होत्या. त्यानंतर मोठे जनआंदोलन झाले होते. पुण्याची घटना ही तितकीच गंभीर आहे. सरकार बेफिकीर असल्याने राज्यात महिला सुरक्षित नाहीत असे सपकाळ म्हणाले.

राज्याची जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. गृहमंत्री हे केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यात व्यस्त असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करत आहे, असेही सपकाळ म्हणाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्र्यांकडे पीए, ओएसडी आणि पीएस म्हणून काम करणाऱ्या काही अधिकाऱ्यांना फिक्सर म्हटल्याने सर्वच अधिकाऱ्यांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जात आहे, त्यामुळे हे 16 अधिकारी कोण आहेत व ते कोणत्या मंत्र्यांकडे काम करत होते हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावे या मागणीचा पुनरुच्चार काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

राखी सावंत बनणार पाकिस्तानची सून; ड्रामा क्वीनच्या हातात कोणी घातली अंगठी? राखी सावंत बनणार पाकिस्तानची सून; ड्रामा क्वीनच्या हातात कोणी घातली अंगठी?
फिल्म इंडस्ट्रीमध्ये राखी सावंतला ड्रामा क्वीन म्हटलं जातं. कारण कधी आणि कसं लाइमलाइटमध्ये यायचं हे तिला चांगलं माहीत आहे. आता...
शरीरात या 5 जागी दुखत असेल तर समजून जा, कॉलेस्ट्रॉल वाढलंय…
महाशिवरात्रीनिमित्त अंघोळीसाठी गेलेले सहा जण बुडाले
गुन्हेगारी पार्श्वभूमीचे नेते राजकारणातून हद्दपार होणार? केंद्र सरकारने मांडली सर्वोच्च न्यायालयात बाजू
स्वारगेट बलात्कार प्रकरणी शिवसेनेचा दणका, वसंत मोरेंच्या नेतृत्वात आंदोलन
स्वारगेट बस स्थानक महिला अत्याचार प्रकरण, एसटी अधिकाऱ्यांवर गंडांतर, परिवहनमंत्र्यांचे आदेश काय
मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचा मास्टर प्लॅन, अजितदादांसाठी डोकेदुखी ठरलेला ‘तो’ नेता करणार शिवसेनेत प्रवेश