अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रेमसंबंध ठेवून रेखाने स्वतःचं आयुष्य…, अभिनेत्रीच्या वडिलांचं मोठं वक्तव्य

अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रेमसंबंध ठेवून रेखाने स्वतःचं आयुष्य…, अभिनेत्रीच्या वडिलांचं मोठं वक्तव्य

Rekha Love Life: बॉलिवूडच्या एव्हरग्रीन अभिनेत्री रेखा यांच्या खासगी आयुष्याबद्दल आज सर्वांना माहिती आहे. महानायक अमिताभ बच्चन यांच्यासोबत रेखा यांच्या नात्याची तुफान चर्चा रंगली. पण स्वतः रेखा यांनी देखील बिग बी यांच्यासोबत असलेल्या नात्यावर अनेकदा मौन सोडलं. पण अमिताभ बच्चन यांनी कायम रेखा यांच्यासोबत असलेल्या नात्यावर मौन बाळगलं. रेखा यांच्या वडिलांनी मात्र दोघांच्या नात्यावर मोठं वक्तव्य केलं होतं.

एका मुलाखतीत रेखा यांचे वडील जेमिनी गणेशन म्हणाले, ‘मला अनेकांनी सांगितलं होतं की, अमिताभ बच्चन यांच्यासोबत प्रेमसंबंध ठेवून रेखाने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त केलं आहे. पण रेखा हिच्यासोबत कधीच तिच्या खासगी आयुष्यावर चर्चा केली नाही आणि करू देखील का?’ असं देखील रेखा यांचे वडील जेमिनी गणेशन म्हणाले होते.

रेखा आणि वडील जेमिनी गणेशन यांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, जेमिनी गणेशन यांनी कधीच रेखा यांना लेकीचा दर्जा आणि वडिलांचं प्रेम दिलं नाही. एवढंच नाही तर, वडिलांच्या निधनानंतर रेखा यांनी वडिलांचं अंत्यदर्शन देखील घेतलं नाही.

वडिलांसोबत असलेल्या नात्यावर देखील रेखा यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. ‘त्यांच्या निधनानंतर मी दुःख का व्यक्त करु. त्यांच्या आयुष्यात माझ्यासाठी कोणतंच स्थान नव्हतं. वडील म्हणून माझ्या आयुष्यात त्यांचं काहीही योगदान नाही. त्यांच्यासोबत मी एकही क्षण घालवला नाही यासाठी मला आनंद आहे. ते फक्त माझ्या कल्पनांमध्ये सामील होते… वडील म्हणून त्यांनी काहीही केलं नाही…’ असं रेखा म्हणाल्या होत्या. 2005 मध्ये रेखा यांच्या वडिलांचं निधन झालं.

रिपोर्टनुसार, जेमिनी गणेशन यांनी कधीच रेखा यांचा स्वीकार मुलगी म्हणून केला नाही. शिवाय रेखा यांच्या आई पुष्पावल्ली यांच्यासोबत कधी लग्न देखील केलं नाही.जेमिनी गणेशन यांनी त्यांच्या आयुष्यात कधीच रेखा आणि त्यांच्या आईचा कुटुंब म्हणून स्वीकार केला नाही.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीस सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठं गिफ्ट, अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात होणार मोठी घोषणा फडणवीस सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठं गिफ्ट, अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात होणार मोठी घोषणा
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला, अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला होता, तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र...
कोणाचाही फोन येताच रणवीर सिंग काय करायला लागतो? दीपिकची इंस्टा पोस्ट चर्चेत
तमन्ना भाटियाचा ‘हा’ हॉरर चित्रपट पाहण्याची चूक करू नका; डोकं धरून बसाल; तमन्नाही यामुळे झालीये ट्रोल
कतरिना फारच धार्मिक; कर्नाटकातील या मंदिरात तब्बल 4 ते 5 तास केली ‘सर्प संस्कार पूजा’
Chandrapur News – चंद्रपूर जिल्ह्यातील 598 गावातील पाणी प्रदूषित, 393 नमुने फ्लोराइडयुक्त आढळले
महायुती सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल
पुन्हा दुखापती झाली तर जसप्रीत बुमराहचं करिअर संपुष्टात येईल, शेन बॉन्डचं मोठं विधान