“ती कोणाची पर्सनल प्रॉपर्टी नाहीये..” फॅनने अचानक आलियाचा हात धरला, रणबीरने सुनावलं अन् नेटकरीही संतापले
बॉलिवूड सेलिब्रिटींना चाहत्यांमुळे अनेकदा समस्यांना तोंड द्यावं लागतं. फॅन्सबाबतचे बरेच विचित्र किस्से सेलिब्रिटींसोबत घडत असतात. असाच एक किस्सा आलियासोबतही घडला. पण त्यावेळी रणबीर मात्र तिचं संरक्षण करताना दिसून आला.
फॅनने अचानक आलियचा हात धरला
अलिकडेच, रणबीर कपूर आणि आलिया भट्ट दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी गेले होते. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रणबीर कपूर त्याची पत्नी आलिया भट्टला प्रोटेक्ट करताना दिसत आहे. खरंतर, जेव्हा आलिया आणि रणबीर पार्टीला पोहोचले, त्यावेळी एका चाहतीने अचानक मागून येऊन आलियचा हात धरला अन् तिला तिचा सेल्फी काढण्यासाठी विनंती केली. तेव्हा हे पाहून आलिया देखील थोडी दचकली. तसेच हे रणबीरला देखील फॅनचं हे कृत्य आवडलं नाही.
फॅनच्या कृतीने रणबीर नाराज
रणबीर आणि आलिया गाडीतून उतरून पार्टीकडे जाताच, एक महिला चाहतीने आलियासोबत हा प्रकार केला. या कृतीनंतर रणबीर खूप प्रोजेक्टिव्ह होताना दिसत आहे. तो स्वतः आलियाला चाहत्यांच्या आणि पापाराझींच्या गर्दीतून सुरक्षितपणे पुढे घेऊन जातो आणि सर्वांना शांततेत आणि आरामात फोटो काढण्यास सांगतो.
रणबीर कपूरची प्रोजेक्टिव्ह बाजू
याचे व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. रणबीर कपूरची प्रोजेक्टिव्ह बाजू पाहून नेटकऱ्यांनीही त्याचं कौतुक केलं आहे. आणि अशा पद्धतीने सेलिब्रिटींचे हात पकडणं, किंवा थेट त्यांच्या जवळ जाणं अशांनाही नेटकऱ्यांनी फटकार लगावली आहे. दरम्यान त्या महिला चाहतीने जे केलं ते कोणालाच आवडणारं नव्हतं असंही सोशल मीडियावर कमेंट्स येताना दिसत आहेत .
नेटकऱ्यांकडूनही फॅन्सच्या अशा वागण्यावर टीका
दरम्यान व्हिडिओमध्ये आलिया भट्ट देखील रणबीरच्या या प्रोटेक्टिव्ह कृतीमुळे भारावून जाताना दिसत आहे. ती रणबीरकडे त्यावेळी अगदी प्रेमळ नजरेने पाहताना दिसत आहे. त्यांचा हा क्षण देखील व्हिडीओमध्ये कैद झाला आहे. यावेळी आलियाच्या चेहऱ्यावर एक मोठे हास्य दिसतं असून जे पाहून ती रणबीरच्या कृतीवर खूप खूश असल्याचे स्पष्ट होतं.व्हिडिओवर कमेंट करताना एका युजरने लिहिले की, “हा आलियाचा वैयक्तिक अंगरक्षक आहे.”, त्याच वेळी, काही युजर्सने म्हटलं आहे की, “लोकांमध्ये शिष्टाचार का नसतो?” तर एकाने लिहिले की, “लोकांनी नीट वागायला शिकले पाहिजे”. तसेच बऱ्याच जणांनी अशाही कमेंट केल्या आहेत की आलियाचा हात धरायला ती कोणाचीही पर्सनल प्रॉपर्टी नाहीये.
रणबीर कपूर आणि आलिया भट्ट पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणार आहेत. संजय लीला भन्साळी यांच्या आगामी ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दोघेही एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात विकी कौशल देखील मुख्य भूमिकेत असेल.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List