ऐश्वर्याच्या ‘या’ सवयीचा प्रचंड त्रास होतो….अखेर अभिषेकने स्पष्टच सांगितलं
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्चन हे नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणाने नेहमीच चर्चेत असतात. कधी त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चांमुळे तर कधी त्यांच्या घरगुती वादांमुळे. मध्यंतरी तर त्यांच्या घटस्फोटांच्या वादावरून बरीच चर्चा रंगली होती. पण त्या दोघांनी मात्र कधीच त्याच्यावर भाष्य केलं नाही. पण एका मुलाखती दरम्यान अभिषेक ऐश्वर्याबद्दल असं काही बोलून गेला की त्याचं हे वक्तव्य आता जोरदार व्हायरल होत आहे.
अभिषेकनं सांगितलं ऐश्वर्याबद्दल न आवडणारी गोष्ट
अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय बच्च यांच्या लग्नाला आता 17 वर्षे पूर्ण झाली आहेत. अलीकडेच सोशल मीडियावर अभिषेकच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्याने पत्नी ऐश्वर्याबद्दल काय आवडतं आणि काय आवडत नाही याबद्दल खुलासा केला आहे. हा व्हिडिओ चाहत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चर्चेत आला आहे.
अभिषेक स्पष्टच म्हणाला तिची ही सवय…
‘कॉफी विथ करण’ या प्रसिद्ध शोमध्ये अभिषेक बच्चनने आपल्या वैवाहिक जीवनाविषयी सांगितलं आहे. त्याला जेव्हा विचारण्यात आलं की त्याला ऐश्वर्याची आवडणारी आणि न आवडणारी गोष्ट कोणती तेव्हा तो म्हणाला की, तिची आवडणारी गोष्ट म्हणजे ऐश्वर्या त्याच्यावर प्रचंड प्रेम करते. आणि न आवडणारी गोष्ट म्हणजे ती ज्या पद्धतीने पॅकिंग करते. अभिषेकने सांगितलं की ऐश्वर्या ज्या पद्धतीने पॅकिंग करते त्या सवयीचा प्रचंड त्रास होतो. त्याच मुलाखतीत अभिषेकने असंही सांगितलं की, त्याने ऐश्वर्याशी लग्न केवळ ती मिस वर्ल्ड होती किंवा जगातील सर्वात सुंदर स्त्री म्हणून केले नाही.तर तिच्या व्यक्तिमत्त्वाने तो प्रभावित झाला.
लग्नानंतर ऐश्वर्याने स्वतःला कितपत बदललं
एवढंच नाही त्याने असंही सांगितलं की, दोघांमध्ये उत्तम समजूत असून त्यांच्या वैवाहिक जीवनातील अनेक आठवणी अविस्मरणीय आहेत. 2007 मध्ये आलेल्या ‘गुरु’चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ऐश्वर्या आणि अभिषेक आंतरराष्ट्रीय दौऱ्यावर होते. त्यावेळी एका पत्रकाराने ऐश्वर्याला विचारलं होतं की लग्नानंतर तिने स्वतःला कितपत बदललं आहे. यावर तिने स्पष्ट उत्तर दिलं होतं की, ती विवाहाचा आनंद घेत आहे आणि भविष्यात आई होण्याची उत्सुकता बाळगून आहे. तिने असेही स्पष्ट केलं होते की लग्नानंतर तिने स्वतःला गमावले असं काहीही वाटत नाही.
ऐश्वर्या कोणाला गुरु मानते?
ऐश्वर्या राय बच्चनने 1997 मध्ये मणिरत्नम दिग्दर्शित ‘इरुवर’चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. त्यानंतर तिने पुन्हा मागे वळून पाहिलं नाही. एका मुलाखतीत ऐश्वर्याने मणिरत्नमबद्दल बोलताना सांगितलं होतं की, “मी त्यांच्या दिग्दर्शकीय शैलीबद्दल बोलू शकत नाही कारण मी त्यांना नेहमीच गुरु मानलं आहे. माझ्या करिअरच्या सुरुवातीलाच मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली हे माझे भाग्य आहे. आज त्यांच्या चित्रपटासाठी मिळालेली प्रसिद्धी पाहून आनंद होतो. 13 नामांकने मिळवणे ही मोठी गोष्ट असली तरी ही संख्या इथवरच थांबू नये.” असं म्हणतं तिने मणिरत्नम यांचं कौतुक केलं होतं.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List