‘छावा’च्या विरोधात जितकं बोलाल तितकंच…, सिनेमाचा विरोध करणाऱ्यांना ॲक्शन दिग्दर्शकाने चांगलंच सुनावलं
Chhaava: अभिनेता विकी कौशल आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना स्टारर ‘छावा’ सिनेमाला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळत आहे. फक्त भारतातच नाही तर, जगभरात सिनेमाने अनेक नवे विक्रम रचले आहेत. बॉक्स ऑफिस देखील ‘छावा’ सिनेमाच्या पुढे नतमस्तक झाला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांच्या शौर्यावर आधारलेल्या ‘छावा’ सिनेमाला प्रेक्षकांचं प्रेम मिळत आहे. तर दुसरीकडे सिनेमाला विरोध करणाऱ्यांची संख्या देखील कमी नाही. आता सिनेमाला विरोध करणाऱ्यांना ॲक्शन दिग्दर्शकाने चांगलंच सुनावलं आहे. त्यांनी या सिनेमाचा बचाव केला असून सिनेमाच्या हितासाठी स्वतःचं मत व्यक्त केलं आहे.
काय म्हणाले ॲक्शन दिग्दर्शक?
‘छावा’ सिनेमाला विरोध करणाऱ्यांबद्दल सिनेमाने ॲक्शन दिग्दर्शक परवेज शेख म्हणाले ‘जर तुम्ही छावा सिनेमा पाहिला असेल तर, सिनेमात प्रत्येक जण छत्रपती संभाजी महाराज यांच्यासोबत होते. पण काही लोक त्यांच्या विरोधात होते. ज्यामुळे महाराज शत्रूच्या तावडीत सापडले. तर काही लोक याठिकाणी देखील आहेत, महाराष्ट्र आणि भारतात…’
‘तेव्हाही आपलेच विरोधत होते आणि काही लोक अजूनही आहेत. हे लोक जितकं विरोधात बोलतील, तितकाच सिनेमा हिट होईल. त्यावेळी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात खूप काही घडलं होते, त्यामुळेच ते इतके मोठे महाराज झाले.’ असं शेख म्हणाले.
सिनेमाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर देखील परवेज शेख यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. ‘सिनेमा जेव्हा तयार होत होता, तेव्हा मी सांगितलं होतं की सिनेमा हीट होईल. शुटिंगच्या वेळी छत्रपती संभाजी महाराजांबद्दल अनेक लहान – मोठ्या गोष्टी लक्षात घेऊन सिनेमा बनवण्यात आला. कारण आम्हाला माहीत होतं की, एका छोट्याशा चुकीनेही मोठा गोंधळ होऊ शकतो.’
विकी कौशलचं केलं कौतुक
परवेज शेख म्हणाले, ‘जर ॲक्शन दिग्दर्शक बाहेरील देशातील असता तर इतकी चांगली कमागिरी करूच शकला नसता. जी मी केली आहे. कारण माझं शिक्षण मुंबईत झालं आहे. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल लहानपणापासून वाचत आहे…’
‘लक्ष्मण उतेकर यांच्यासोबत काम करताना खूप मजा आली कारण त्यांनी सिनेमासाठी त्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं जेणेकरून सर्जनशील कोन समोर येऊ शकतील. विकी कौशलनेही उत्तम अभिनय केला आहे.’ असं देखील परवेज शेख म्हणाले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List