‘छावा’ मध्ये छत्रपती शिवरायांचा आवाज कोणी दिला माहितीये? जाणून विश्वास बसणार नाही
छत्रपती संभाजी महाराज यांची शौर्यगाथा सांगणारा ‘छावा’ सिनेमाचं यश हे सर्वांनाच माहित आहे. ‘छावा’ ने बॉक्स ऑफिवर जबरदस्त धुमाकूळ घातला आहे. तसेच चित्रपटाची कमाई देखील 300 कोटींच्या जवळपास पोहचल्याचं दिसून येत आहे. दरम्यान या चित्रपटातील सर्वच कलाकारांचं प्रेक्षकांनी कौतुक केलं आहे. छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारणाऱ्या विकी कौशलचं तर प्रेक्षक कौतुक करून थकत नाहीयेत. तर रश्मिका मंदाना हिने महाराणी येसूबाईंची भूमिका साकारली आहे. तसेच इतर कलाकारांच्याही भूमिका प्रचंड लोकप्रिय ठरल्या आहेत.
चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका नाही तर आवाज
मात्र या सिनेमातील आणखी एक गोष्ट जी प्रेक्षकांच्या मनापर्यंत पोहोचली आहे. ती म्हणजे शंभूराजे आणि शिवाजी महाराजांमधील संवाद. हे सर्वांनाच माहित आहे की चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोणीही साकारलेली नसून त्यांचा आवाज मात्र देण्यात आला आहे. पण हा आवाज नक्की कोणी दिला आहे माहितीये?
बाल शंभूराजेंच्या हाकेला उत्तर देणारा शिवरायांचा आवाज थेट काळजापर्यंत पोहोचतो
छावा सिनेमात छत्रपती शिवाजी महाराजांची व्यक्तिरेखा कोणीही साकारली नसली तरी त्यांचे अस्तित्व मात्र संपूर्ण सिनेमात दाखवलं आहे. चित्रपटात मध्ये मध्ये बाल शंभूराजे त्यांच्या आईसाहेब आणि आबासाहेबांना हाक मारताना दिसतात. तेव्हा त्यांच्या हाकेला ओ देणारे आणि त्यांना मार्ग दाखवणारा छत्रपती शिवरायांचा आवाज एकू येतो. शिवरायांच्या फक्त या आवाजाचा संवादही प्रेक्षकांच्या अगदी काळजापर्यंत पोहोचतो. हा आवाज कोणी दिला असेल याबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता होतीच. शेवटी याचं उत्तर आता समोर आलं आहे.
शिवरायांचा आवाज कोणी दिला माहितीये?
तर सिनेमातील छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आवाज चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनीच दिला आहे. होय, विजय विक्रम हे डबिंग आर्टिस्ट आहेत. त्यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन ही माहिती दिली आहे. चित्रपटातील बाल शंभूराजेंसोबत संवाद साधणारे त्यांचे आबासाहेब म्हणजेच शिवरायांचा हा आवाज उतेकरांनीच दिला आहे. पण सिनेमा पाहताना हे कुठेही लक्षात येत नाही. यावरून लक्ष्मण उतेकर हे उत्तम व्हिओ आर्टीस्ट असल्याचंही लक्षात येतं.
दरम्यान छावा सिनेमाने संपूर्ण देशभरात चांगली कमाई केली आहे. चित्रपटाचे एकूण बजेट 165 कोटी असताना सिनेमाने 300 कोटींच्या घरात एन्ट्री केली आहे. तर संपूर्ण जगात सिनेमाने 400 कोटींची कमाई केली आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List