लग्नाबाबत ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री स्पष्टच बोलली, ‘माझ्यासाठी ते वाईट स्वप्नासारखं..’

लग्नाबाबत ‘द केरळ स्टोरी’ फेम अभिनेत्री स्पष्टच बोलली, ‘माझ्यासाठी ते वाईट स्वप्नासारखं..’

सुदिप्तो सेन दिग्दर्शित ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अभिनेत्री अदा शर्माने मुख्य भूमिका साकारली. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलीच कमाई केली आणि सोशल मीडियावर बरीच चर्चासुद्धा घडवून आणली. या चित्रपटानंतर अदा तिच्या घर खरेदीमुळे चर्चेत आली होती. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतने ज्या घरात आत्महत्या केली, त्याच घरात अदा शर्मा राहायला गेली आहे. आता अदा तिच्या लग्नाबद्दलच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिला तिच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला असता तिने लग्न करणार नसल्याचं म्हटलंय.

“मी लग्नच करू नये असं माझं स्वप्न आहे. लग्नाचं स्वप्न पाहणं म्हणजे माझ्यासाठी वाईट स्वप्नासारखं आहे. मी कोणत्याही नात्याला घाबरत नाहीये. मी ऑनस्क्रीन अनेकदा नवरीची भूमिका साकारली आहे. त्यामुळे खऱ्या आयुष्यात लग्नाबद्दलची माझी आवडच निघून गेली आहे. माझी इच्छाच होत नाही. पण जर भविष्यात माझे विचार बदलले तर मी अत्यंत आरामदायी कपड्यांमध्ये लग्न करेन. भरजरी लेहंग्यात करणार नाही”, असं ती म्हणाली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Adah Sharma (@adah_ki_adah)

अदा शर्माने हिंदीसोबतच तेलुगू चित्रपटांमध्येही काम केलंय. 2008 मध्ये तिने ‘1920’ या हॉरर चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर तिने ‘हसी तो फंसी’, ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. अदा ‘हार्ट अटॅक’, ‘क्षणम’, ‘S/O सत्यमूर्ती’ यांसारख्या दाक्षिणात्य चित्रपटांमध्येही झळकली.

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटामुळे अदा शर्मा विशेष चर्चेत आली. भारतात कमाईचा 200 कोटींचा टप्पा पार करणारा हा महिलाप्रधान भूमिका असलेला पहिला चित्रपट ठरला होता. केरळमधील हिंदू आणि ख्रिश्चन मुलींचं धर्मांतर केल्यानंतर त्यांना कथित ISIS दहशतवादी संघटनेत सामील करून घेतलं गेलं, अशी कथा यामध्ये दाखवण्यात आली होती. त्यामुळे हा चित्रपट ‘इस्लामोफोबिक’ असल्याचीही टीका झाली होती. ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्माशिवाय योगिता बिहानी, सिद्धी इदनानी, सोनिया बलानी, विजय कृष्ण, प्रणय पचौरी आणि प्रणव मिश्रा यांच्याही भूमिका आहेत. सुदिप्तो सेन यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून विपुल शाह त्याचे निर्माते आहेत.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

फडणवीस सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठं गिफ्ट, अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात होणार मोठी घोषणा फडणवीस सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीला मोठं गिफ्ट, अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात होणार मोठी घोषणा
लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला मोठा धक्का बसला, अनेक दिग्गज उमेदवारांचा पराभव झाला होता, तर महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं होतं. मात्र...
कोणाचाही फोन येताच रणवीर सिंग काय करायला लागतो? दीपिकची इंस्टा पोस्ट चर्चेत
तमन्ना भाटियाचा ‘हा’ हॉरर चित्रपट पाहण्याची चूक करू नका; डोकं धरून बसाल; तमन्नाही यामुळे झालीये ट्रोल
कतरिना फारच धार्मिक; कर्नाटकातील या मंदिरात तब्बल 4 ते 5 तास केली ‘सर्प संस्कार पूजा’
Chandrapur News – चंद्रपूर जिल्ह्यातील 598 गावातील पाणी प्रदूषित, 393 नमुने फ्लोराइडयुक्त आढळले
महायुती सरकारला मराठी माणसांच्या सणांविषयी इतका आकस का आहे? आदित्य ठाकरे यांचा संतप्त सवाल
पुन्हा दुखापती झाली तर जसप्रीत बुमराहचं करिअर संपुष्टात येईल, शेन बॉन्डचं मोठं विधान