तुफान रंगल्यात गोविंदा – सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चा, ‘त्या’ पोस्टमुळे माजली सर्वत्र खळबळ
गेल्या काही दिवसांपासून अभिनेता गोविंदा आणि सुनीता अहुजा यांच्या खासगी आयुष्याच्या चर्चा रंगल्या आहेत. काही रिपोर्ट आणि सोशल मीडियावर करण्यात आलेल्या दाव्यानुसार, लग्नाच्या 37 वर्षानंतर गोविंदा आणि सुनीता विभक्त होणार आहे. सध्या दोघांच्या घटस्फोटाच्या चर्चांनी जोर धरला आहे. पण यावर गोविंदा, सुनीता आणि त्यांच्या कुटुंबियांकडून कोणतीच अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
सांगायचं झालं तर, गोविंदा आणि सुनीता यांच्या घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्यानंतर चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला आहे. सोशल मीडिया रेडिटवर व्हायरल झालेल्या एका पोस्टनंतर सर्वत्र खळबळ माजली आहे. ‘लग्नाच्या 37 वर्षांनंतर गोविंदा सुनिता विभक्त होत आहेत…’ याच एका पोस्टनंतर दोघांच्या नात्याच्या चर्चा रंगल्या आहेत.
गोविंदाचं मराठी अभिनेत्रीसोबत ‘प्रेमसंबंध’?
काही सूत्र आणि मीडिया रिपोर्ट्सने असा दावा केला आहे की गोविंदाच्या 30 वर्षीय मराठी अभिनेत्रीसोबतच्या अफेअरमुळे हे प्रकरण या पातळीवर पोहोचले आहे. पण ही मराठी अभिनेत्री कोण आहे? याबद्दल काहीही कळू शकलेलं नाही. तिचं नाव देखील समोर आलेलं नाही. दरम्यान, सतत मतभेद वाढत असल्यामुळे गोविंदा आणि सुनीता यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असं देखील सांगण्यात येत आहे.
सुनीता अहुजा हिचं वक्तव्य
एका जुन्या मुलाखतीत सुनीता म्हणाल्या होत्या की, ‘गोविंदा आणि मी वेगळ्या घरात राहतो. मी माझ्या मुलांसोबत एका फ्लॉटमध्ये राहते आणि गोविंदा दुसऱ्या… गोविंदाची लाईफस्टाईल फार वेगळी आहे. त्याच्या भोवती कायम लोकांची गर्दी असते… पण त्याला मुलांसोबत व्यक्तीत करायला आवडतं…’ असं सुनीता म्हणाल्या होत्या.
सांगायचं झालं तर, अद्याप गोविंदा याने देखील घटस्फोटाच्या चर्चांवर अधिकृत वक्तव्य केलेलं नाही. अभिनेता सध्या त्याच्या आगामी सिनेमाच्या तयारीत व्यस्त आहे. दोघांच्या नात्याबद्दल सांगायचं झालं तर, अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर गोविंदा आणि सुनीता यांनी लग्न केलं.
गोविंदा आणि सुनीता यांनी 1987 मध्ये लग्न केलं. गोविंदा सोबत लग्न केलं तेव्हा सुनीता फक्त 18 वर्षांच्या होत्या. तर लग्नाच्या एका वर्षात सुनीता यांनी लेक टीना हिला जन्म देखील दिला. दोघांना एक मुलगा देखील आहे. मुलाचं नाव यशवर्धन आहे.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List