काँग्रेसला मत दिल्यास पाकिस्तान विजयी होईल; केंद्रीय मंत्र्यांचं वादग्रस्त विधान, निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल
तेलंगणामध्ये विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 27 फेब्रुवारी रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचारासाठी करीमनगर येथे आलेले भाजपचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय गृहराज्य मंत्री बंदी संजय कुमार यांनी काँग्रेसची तुलना पाकिस्तानशी केली आहे. यामुळे तेलंगणामधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेसने बंदी संजय कुमार यांची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे.
बंदी संजय कुमार यांनी निझामाबाद, मेडक, करीमनगर आणि आदिलाबाद येथे प्रचारसभा घेतली. यावेळी मतदारांना संबोधित करताना त्यांनी काँग्रेसची तुलना पाकिस्तानशी केली. काँग्रेसला मतदान केले तर पाकिस्तान विजयी होईल, असे ते म्हणाले.
काय म्हणाले बंदी संजय कुमार?
याच महिन्यात 27 फेब्रुवारी रोजी विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी निवडणूक पार पडणार आहे. हा हिंदुस्थान आणि पाकिस्तानचा सामना आहे. भाजप टीम इंडिया आहे, तर काँग्रेस पाकिस्तानची टीम आहे. ज्या प्रकारे चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला पराभूत करून चाहत्यांच्या आशा, आकांक्षा पूर्ण केल्या, त्याच प्रमाणे भाजपही लोकांच्या आशा, आकांक्षा पूर्ण करेल. भाजपला मतदान केले तर टीम इंडियाचा विजय होईल आणि काँग्रेसला मतदान केल्यास पाकिस्तानचा विजय होईल, असे वादग्रस्त विधान बंदी संजय कुमार यांनी केले. काँग्रेस आमदार बी. महेश गौड यांनी बंदी संजय कुमार यांच्या विधानाचा एक्स (ट्विटर) वर पोस्ट करून समाचार घेतला.
Had a media interaction today at Karimnagar DCC Office along with Minister @Ponnam_INC Garu and Karimnagar DCC President @DrKavvampally Garu
Bandi Sanjay’s divisive politics and his attempts to link every issue to religion are an insult to the wisdom of graduates. BJP & BRS’s… pic.twitter.com/c9xXqVvqzC
— Bomma Maheshkumar goud (@Bmaheshgoud6666) February 25, 2025
काँग्रेसची निवडणूक आयोगात तक्रार
काँग्रेस खासदार चामला किरण कुमार यांनी बंदी संजय कुमार यांच्या विधानाचा समाचार घेत त्यांच्याविरोधात निवडणूक आयोगात तक्रार केली आहे. बंदी संजय कुमार यांच्यावर तात्काळ आणि कठोर कारवाई करण्याची मागणी चामला किरण कुमार यांनी केली आहे.
Congress MP Chamala Kiran Kumar Reddy, along with other Congress leaders, today complained to the Chief Electoral Officer of Telangana against Union Minister for State Bandi Sanjay’s remarks comparing the Congress party to Pakistan and the BJP to India, referring to a cricket… pic.twitter.com/DhnP9kjKqs
— ANI (@ANI) February 25, 2025
बीआरएस-भाजपची छुपी आघाडी
दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री ए. रेवंत रेड्डी यांनी बीआरएस आणि भाजपमध्ये छुपी आघाडी असल्याचा आरोप केला आहे. निझामाबाद येथे झालेल्या सभेमध्ये रेड्डी यांनी केंद्रीय गृहराज्य मंत्री बंदी संजय कुमार यांच्या वादग्रस्त विधानाचा उल्लेखही केला. बीआरएस सरकारमधील भ्रष्टाचार समोर आल्यानंतरही भाजपने चंद्रशेखर राव आणि त्यांचा मुलगा के.टी. राव यांच्याविरोधात कोणतीही कारवाई केली नाही, असा आरोप रेड्डी यांनी केला.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List