राजकीय स्वार्थासाठी धर्माच्या नावावर भाजपला देशाचा पाकिस्तान-अफगाणिस्तान करायचाय, संजय राऊत यांची टीका
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी मल्हार मटण वरून भाजपवर जोरदार टीका केली आहे. ”कुणी कोणाकडून काय खावं यावर कुणी कायदे करत नाही. भाजपला राजकीय स्वार्थासाठी धर्माच्या नावावर देशाचा पाकिस्तान-अफगाणिस्तान करायचाय, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपची सालटी काढली.
कुणी कोणाकडून काय खावं यावर कुणी कायदे करत नाही. राजकीय स्वार्थासाठी धर्माच्या नावावर भाजपला देशाचा पाकिस्तान-अफगाणिस्तान करायचाय. या देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात हे जे खटकावाले आहेत त्यांचे बापजादे नव्हते. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नव्हता. या देशाचे स्वातंत्र्य मिळवताना सर्व जातीची, धर्माची लोकं होती, तेव्हा हा देश स्वतंत्र झाला. त्या लढ्यात ना भाजप, संघ होता ना जे आता खटके लटके करत होते त्यांचे बापजादे नव्हते. काँग्रेस गांधीच्या नेतृत्वाखाली सर्व जातीचे लोकं होते अगदी आदिवाशी, भिल्ल, मु्स्लीम देखील आहेत, फासावर गेले आहेत. हिंदू लोकंच या झटका मटणवाल्यांना झटका देणार, पागल झालेयत ते, अशा शब्दात संजय राऊत यांनी भाजपला फटकारले.
About The Author

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.
Comment List